Thane Lift Collapse : धक्कादायक! ठाण्यात लिफ्ट कोसळून 5 जणांचा मृत्यू

विक्रांत चौहान

ADVERTISEMENT

thane lift collapse 40 storey high rise building 6 people dead
thane lift collapse 40 storey high rise building 6 people dead
social share
google news

ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत अंडरग्राऊंड लिफ्ट पडून 5 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी आहे.बाळकुम परिसरात रुणवाल एरिन नावाच्या 40 मजली इमारतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.प्राथमिक माहितीनुसार, कामगार काम संपवून खाली उतरत असताना ही घटना घडली आहे.या घटनेने सध्या परीसरात खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशामन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. (thane lift collapse 40 storey high rise building 6 people dead)

ADVERTISEMENT

ठाण्यातील बाळकुम परिसरात रुणवाल एरिन नावाच्या 40 मजली बांधकाम सूरू होते. या दरम्यान इमारतीची लिफ्ट पडून 5 कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नुकत्याच पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. कामगार काम संपवून खाली उतरत असताना लिफ्टचा दोर तुटल्याने हा अपघात घडला.

हे ही वाचा : Ajit Pawar : अजित पवारांनी पुन्हा काढला निवृत्तीचा मुद्दा, शरद पवारांना आव्हान देत म्हणाले…

अपघातग्रस्तांची नावे

१)मोमिन तसलीमा आतिफ़ (स्त्री) (वय 1 वर्ष)
२)मोमिन लतीफ़ (पुरुष) (वय 55)
३)मोमिन उजमा लतीफ़ (स्त्री ) (वय 40)
४)मोमिन बुश्रा आतिफ़ (स्त्री ) (वय 40)
५)मोमिन फरझाना रफ़ीक (स्त्री) (वय 50)
६)मोमिन आइशा वाहाफ (स्त्री) (वय 50)
७) मोमिन मुशारफ़ (स्त्री ) (वय 25)

हे वाचलं का?

या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाला कळवली होती. त्यानंतर तातडीने बाळकुम अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी ओमकार वैती घटनास्थळी टीमसह पोहोचले. तसेच या घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले आहे. या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोन कामगार गंभीर जखमी असून त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान  ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. तर स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनी लिफ्टच्या कंत्राटदारांना आणि साईट इन्चार्जना दोषी ठरवून कडक कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Aditya L1ने तिसऱ्यांदा कक्षा बदलली, सुर्याच्या किती जवळ पोहोचला?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT