Bengaluru : ‘तुझ्या मरणानंतरच माझी सुटका होईल…’, आईला तडफडून संपवणाऱ्या मुलीची खळबळजनक कबुली
Crime News: बंगळुरूमध्ये एका महिलेने तिच्या आईची हत्या केल्यानंतर अत्यंत खळबळजनक कबुली जबाब दिला आहे. पाहा महिलेने नेमकं काय म्हटलंय
ADVERTISEMENT

बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये (Bengaluru) 12 जून रोजी एक अत्यंत भयंकर घटना घडली. 12 जूनला बंगळुरुतील एका पोलीस स्टेशनमध्ये एक महिला निळ्या रंगाची ट्रॉली बॅग घेऊन आली होती. कदाचित ही महिला एफआयआर नोंदवण्यासाठी आली असावी, असे पोलिसांना वाटले. पण तिने पोलिसांना जी गोष्ट सांगितली त्याने पोलिसांच्या देखील पायाखालची जमीन सरकली. महिलेने आपले नाव सोनाली सेन असल्याचे पोलिसांना सांगितले. जी फिजिओथेरपिस्ट आहे. पोलिसांनी तिला तिथे येण्याचे कारण विचारले असता तिने त्यांना सांगितलं की तिने तिच्या आईची हत्या (Mother Murder) केली आहे. (bengaluru daughter murder mother dead body in suitcase police station crime news)
हे ऐकून पोलिसांना वाटले की, कदाचित ती महिला एकतर मानसिक रुग्ण असावी किंवा ती विनोद करत आहे. मात्र महिलेने पुन्हा पोलिसांना सांगितलं की, तिने तिच्या आईची हत्या केली असून तिचा मृतदेह सोबत असलेल्या बॅगेत भरुन आणला आहे.
हे ऐकून पोलिसांचे धाबे दणाणले. त्यावेळी पोलिसांनी तिला सांगितलं की, तुझ्याकडची बॅग उघडून दाखव. त्यावर सोनालीने कोणतेही आढेवेढे न घेता बॅग उघडून दाखवली. ज्यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह होता. जो हात-पाय दुमडून बॅगेत भरण्यात आला होता. त्यासोबतच एका वृद्ध व्यक्तीचा फोटोही होता.
सोनालीने सांगितले की, हा तिच्या वडिलांचा फोटो आहे. ती म्हणाली की, ‘माझी आई मला वारंवार मारुन टाक असं सांगत होती. म्हणूनच मी तिला मारले.’ महिलेचे हे वक्तव्य ऐकून पोलिसांचाही विश्वास बसला नाही. त्यांनी महिलेला खुर्चीवर बसवले आणि नंतर तिला घडलेली घटना तपशीलवार सांगण्यास सांगितले.










