Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दसरा, दिवाळी झाली गोड! 4500 नंतर 3 हजार खात्यात जमा, तुमचे आले का?
Mukhymantri Ladki Bahin Yojana, Fourth Installement : सरकारने आणखी 3000 रूपये महिलांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून सरकार महिलांच्या खात्यात 3000 जमा करणार होती. त्यानुसार हे पैसे आला महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांची आता दसरा, दिवाळी गोड होणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सरकारची दसरा, दिवाळींची महिलांना भेट

3000 रूपये झाले खात्यात जमा

तुमच्या खात्यात पैसे आले का?
Mukhymantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 आणि 1500 जमा झाले आहेत. हे पैसे खात्यात आल्या आल्याच सरकारने आणखी 3000 रूपये महिलांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून सरकार महिलांच्या खात्यात 3000 जमा करणार होती. त्यानुसार हे पैसे आला महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांची आता दसरा, दिवाळी गोड होणार आहे. (ladki bahin yojana fourth installment 3000 deposite women account mukhymantri ladki bahin yojana scheme ajit pawar aditi tatkare eknath shinde)
खरं तर अनेक महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 जमा झाले आहेत. त्यानंतर आता महिलांच्या खात्यात आता ऑक्टोबरमध्ये चौथा हप्ता जमा होणार होता. मात्र या चौथ्या हप्त्या दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. या आचारसंहितेमुळे सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता असा एकत्र मिळून 3000 रूपये देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार आता महिलांच्या खात्यात 4500 जमा होण्यास सूरूवात झाली आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 4500 अजूनही जमा झाले नाही, 'ही' यादी आताच चेक करा
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आताच ऑक्टोबर महिन्यात देणार असल्याचा मानस महायुती सरकारचा होता. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ही ऑक्टोबरलाच साजरी होणार असून, भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसांतच मिळणार असल्याचे सांगितले गेले होते.

लाडकी बहीण योजनेचे पहिल्यांदा 3000 रूपये दिले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये मिळाले आहेत. बहिणींनी काही काळजी करू नये. कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आधी, भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे. हा शब्द तुम्हाला देतो, असे आश्वासन अजित पवारांनी महिलांना दिले आहे. त्यामुळे चौथ्या हप्त्याचे पैसे आता 10 ऑक्टोबरआधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यानुसार आता महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सूरूवात झाली आहे.