Mumbai: आई मोबाईलवर खेळू देत नाही म्हणून १६ वर्षांच्या मुलाची आत्महत्या
मुंबईतल्या बोरीवली भागात एका १६ वर्षांच्या मुलाने आई मोबाईलवर खेळू देत नाही म्हणून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी बोरीवली GRP पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओम भारत नावाचा मुलगा मोबाइलवर गेम खेळत होता. बुधवारी संध्याकाळी ७ वाजता त्याच्या हातातून त्याच्या आईने त्याच्या हातून मोबाईल काढून घेतला. तसंच मोबाईलवर खेळू नकोस […]
ADVERTISEMENT

मुंबईतल्या बोरीवली भागात एका १६ वर्षांच्या मुलाने आई मोबाईलवर खेळू देत नाही म्हणून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी बोरीवली GRP पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओम भारत नावाचा मुलगा मोबाइलवर गेम खेळत होता. बुधवारी संध्याकाळी ७ वाजता त्याच्या हातातून त्याच्या आईने त्याच्या हातून मोबाईल काढून घेतला. तसंच मोबाईलवर खेळू नकोस हे बजावलं.
यानंतर ओमने सुसाईड नोट लिहिली आणि तो घर सोडून निघून गेला. काही वेळानंतर त्याची आई घरी आली तेव्हा तिला ही चिठ्ठी सापडली. त्यात हे लिहिलं होतं की मी घर सोडून जातोय तसंच आता परत येणार नाही, मी आयुष्य संपवतो आहे असंही त्यात लिहिलं होतं.
ही चिठ्ठी पाहिल्यानंतर दिंडोशी पोलिसांनी ओमचा शोध घेण्यास सुरूवात केली. ओमने मालाड आणि कांदिवली स्टेशन्सच्या दरम्यान ट्रेनमधून उडी मारत आत्महत्या केली. त्याचा मृतदेह पोलिसांना मिळाला आहे. घटना घडल्यानंतर मालाड आणि कांदिवलीचे पोलीसही त्या जागी पोहचले होते. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.