मुंबईला Third Wave चा धोका कमी, 80 टक्के मुंबईकर कोरोना संपर्कात! वाचा काय सांगतो आहे TIFR चा अहवाल?
मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी बसेल कारण साधारण 80 टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात येऊन गेले आहेत. असं TIFR अर्थात टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चने हा अहवाल समोर आणला आहे. दुसऱ्या लाटेचं रौद्ररूप आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. मुंबईसह महाराष्ट्राला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका […]
ADVERTISEMENT

मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी बसेल कारण साधारण 80 टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात येऊन गेले आहेत. असं TIFR अर्थात टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चने हा अहवाल समोर आणला आहे. दुसऱ्या लाटेचं रौद्ररूप आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. मुंबईसह महाराष्ट्राला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला आहे. अनेकांना कोरोना संसर्ग आणि मृत्यूंचं तांडवच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात पाहण्यास मिळालं. मात्र आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Variant Of Concern म्हणजे नेमकं काय? Delta Plus ने टेन्शन का वाढवलं आहे?
या अहवालात नेमकं काय म्हटलं गेलं आहे?
कोरोनाची दुसऱी लाट फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात सुरू झाली.