Kiren Rijju, Arjun Ram Meghwal : PM मोदींचा पुन्हा धक्का, दिग्गज मंत्र्याचं खातंच काढलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

pm narendra modi snatches law ministry from kiren rijiju arjun meghwal gets responsibility
pm narendra modi snatches law ministry from kiren rijiju arjun meghwal gets responsibility
social share
google news

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी आज (18 मे) अचानक आपल्या मंत्रिमंडळात (Cabinet) फार मोठा फेरबदल केला आहे. पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना कायदा मंत्री पदावरून हटविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल (Arjun Meghwal) यांच्याकडे कायदा मंत्रालय सोपविण्यात आलं आहे. किरेन रिजिजू हे केंद्रीय कायदा मंत्री म्हणून सतत चर्चेत होते आणि त्यांनी यापूर्वी न्यायव्यवस्था आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. (arjun ram meghwal replaces kiren rijiju as the law minister rijijiu assigned the ministry of earth sciences)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाला मंजुरी दिली आहे. आता किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालयातून काढून त्यांना भू-विज्ञान मंत्रालयात देण्यात आलं आहे. त्याच वेळी, रिजिजू यांच्या जागी, अर्जुन राम मेघवाल यांना त्यांच्याकडे असलेल्या खात्यांव्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार सोपविण्यात आला आहे.

मंत्रालय बदलल्यानंतर रिजिजू काय म्हणाले?

किरेन रिजिजू यांनी ट्विट केले की, ‘माननीय पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री म्हणून काम करणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी CJI DY चंद्रचूड, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती आणि सर्व कायदा अधिकार्‍यांचे आमच्या नागरिकांना कायदेशीर सेवा प्रदान करण्यात मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मी पंतप्रधान मोदींचा दृष्टीकोन पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहे. भाजपचा एक कार्यकर्ता या नात्याने मी ज्या उत्साहाने आणि उमेदीने काम केले, त्यादृष्टीने मी भू-विज्ञान मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2021 साली रिजिजू बनले होते कायदा मंत्री

रिजिजू हे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. किरेन रिजिजू यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1971 रोजी अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. त्यांनी 2004 मध्ये (अरुणाचल पश्चिम मतदारसंघ) पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि जिंकली देखील होती. पण 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला. 2014 च्या निवडणुकीत रिजिजू पुन्हा विजयी झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना गृहराज्यमंत्री बनवण्यात आले होते.

ADVERTISEMENT

यानंतर, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात म्हणजेच 2019 मध्ये त्यांना क्रीडा मंत्री (स्वतंत्र प्रभार) बनवण्यात आले होते. जुलै 2021 मध्ये, त्यांना मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान कायदा मंत्री करण्यात आले होते. रविशंकर प्रसाद यांच्या जागी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती.

ADVERTISEMENT

कोण आहे अर्जुन राम मेघवाल?

अर्जुन राम मेघवाल हे 2009 पासून बिकानेरचे खासदार आहेत. मेघवाल यांचा जन्म बिकानेरच्या किसमिदेसर गावात झाला. बिकानेरच्या डुंगर कॉलेजमधून बीए आणि एलएलबी केले. यानंतर त्यांनी त्याच महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी (M.A) केली. यानंतर त्यांनी फिलिपाइन्स विद्यापीठातून एमबीएही केले. ते राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी राहिले आहेत आणि राजस्थानमधील अनुसूचित जातीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

हे ही वाचा >> संजय पवार यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, ‘ती’ जाहिरातबाजी भोवली

मेघवाल 2009, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बिकानेरमधून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. 2013 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ते लोकसभेतील भारतीय जनता पक्षाचे मुख्य व्हीप होते. मे 2019 मध्ये, मेघवाल संसदीय कामकाज आणि अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री बनले. आता त्यांच्याकडे कायदा मंत्रालयाची (स्वतंत्र प्रभार) जबाबदारीही देण्यात आली आहे.

न्यायव्यवस्थेवर भाष्य केल्याने रिजिजू आलेले चर्चेत

किरेन रिजिजू काही काळ सातत्याने न्यायव्यवस्थेवर भाष्य केल्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. रिजिजू यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये म्हटले होते की, ‘न्यायाधीशांच्या नियुक्तीची कॉलेजियम पद्धत राज्यघटनेसाठी परकी आहे. कॉलेजियम व्यवस्थेत अनेक त्रुटी असून लोक त्याविरोधात आवाज उठवत आहेत.’ असे ते म्हणाले होते. निवृत्त न्यायाधीश आणि चळवळीतील कार्यकर्ते हे भारतविरोधी टोळीचा भाग असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठानेही रिजिजू यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. एनजेएसी मंजूर नसल्यामुळे कदाचित सरकार न्यायाधीशांच्या नियुक्तीला मान्यता देत नाही, असे खंडपीठाने म्हटले होते. रिजिजू आणि उपाध्यक्ष जगदीप धनखड यांच्या टिप्पणीविरोधात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली होती.

विरोधकांनी निशाणा साधला

– राज्यसभा खासदार कपिल सिब्बल म्हणाले, किरेन रिजिजू कायदा नाही तर आता भू-विज्ञान मंत्री आहेत. कायद्यांमागील विज्ञान समजून घेणे सोपे नाही. ते आता विज्ञानाच्या नियमांशी झुंज देण्याचा प्रयत्न करतील. ‘गुड लक माझ्या मित्रा…’

हे ही वाचा >> Trimbakeshwar Controversy : …म्हणूनच महाराष्ट्र ग्रेट आहे!, काय आहे तुकाराम पालखीचं दर्गा कनेक्शन?

दुसरीकडे, विरोधी पक्षांनी किरेन रिजिजू यांना कायदामंत्री पदावरून हटवण्यावरून हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केले आहे की, “रिजिजू यांना महाराष्ट्राच्या निकालामुळे किंवा मोदानी-सेबी चौकशीमुळे काढून टाकण्यात आले?”

त्याचवेळी काँग्रेस नेत्या अलका लांबा म्हणाल्या की, काही काळासाठी किरेन रिजिजू यांनी न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि न्यायालयांच्या कार्यपद्धतीबाबत केलेल्या टिप्पण्या आणि हस्तक्षेपामुळे मोदी सरकारसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. आपली प्रतिमा वाचवण्यासाठी कायदामंत्र्यांचा बळी देऊन सरकारने चांगले केले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT