Sanjay Raut : ‘यालाच म्हणतात आ बैल…’ , बावनकुळेंच्या फोटोवरून राऊत पुन्हा भिडले, नव्या ट्वीटमध्ये काय?
संजय राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवच फोटो पोस्ट केला आहे. पूर्ण फोटोत हे स्पष्टपणे लक्षात येंत की, तेथे बावनकुळे,त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी, नातू असं सगळं कुटुंब आहे. त्यामुळे ही विकृती मानसिकता कुठेतरी संपवली पाहिजे.
ADVERTISEMENT

Sanjay Raut new Tweet Criticize Bjp : ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी मकाऊतल्या कॅसिनोतला फोटो (Casino Photo) शेअऱ करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. या फोटोंना प्रत्युत्तर देताना भाजपच नेत्याच नाव सांगून बसली होती. त्यामुळे भाजप चांगलीच बुचकळ्यात पडली. या सर्व घडामोडींवर सोमवारी दिवसभर राजकारण पेटले होते. असे असताना आता संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज पुन्हा ट्वीट करून भाजपला डिवचलं आहे. (sanjay raut new tweet chandrashekhar bawankule casino photo macau maharashtra politics)
संजय राऊतांनी सोमवारी शेअर केलेल्या मकाऊतल्या कॅसिनोतला फोटोमध्ये संबंधित नेत्याचे नाव टाळले होते. तसेच संबंधित व्यक्तीने 3.50 कोटी रूपये जुगारात उडवल्याचेही सांगितले होते. या आरोपांना उत्तर देताना भाजपचं संबंधित नेत्याचे नाव सांगुन बसली होती. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत, असे भाजपने स्पष्ट केले होते. यानंतर स्वत: चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमध्ये गेल्याचे कबूल करत यावर खुलासा केला होता.
हे ही वाचा : टक्कल केलं, सिगारेटने जाळलं अन् निर्वस्त्र… अकोल्यात वासनांध तरूणाचे 14 वर्षीय मुलीसोबत क्रूर कृत्य!
Did I name or made allegations against anyone in my tweet ? NO !
All I said in my simple Tweet was that ‘some Nero is busy gambling in Macau (China) as Maharashtra burns…’
But the BJP threw a hit wicket and went on to announunce that the person in picture is ‘their’ State… pic.twitter.com/Ni6oaqt2Tf
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 21, 2023
या सर्व घडामोडीवर आता पुन्हा संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये पुन्हा त्यांनी बावनकुळेचं नाव टाळत भाजपवर टीका केली आहे. मी माझ्या ट्विटमध्ये कोणाचे नाव घेतले किंवा आरोप केले? नाही! मी माझ्या साध्या ट्विटमध्ये एवढेच म्हटले आहे की ‘काही निरो मकाऊ (चीन) मध्ये जुगार खेळण्यात व्यस्त आहे. कारण महाराष्ट्र जळत आहे…’. पण फोटोतील व्यक्ती ‘त्यांचा’ प्रदेशाध्यक्ष असल्याचे सांगून भाजपने हिट विकेट फेकल्याचा टीका राऊत यांनी केली. तसेच यालाच हिंदीत म्हणतात – ‘आ बैल, मुझे मार’, असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला.