NCP: ‘जयंत पाटील.. पुण्यात अमित शाहांना भेटले?’, अजित पवारांचं मोठं विधान
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना भेटल्याच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

Ajit Pawar on Jayant Patil: कृष्णा पांचाळ, पुणे: अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासोबत अनेक दिग्गज नेत्यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. पण यावेळी काही मोजकेच नेते आणि आमदार हे शरद पवारांसोबत (Sharad Pawar) असल्याचं दिसून आलं. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचा समावेश आहे. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावान समजले जातात. मात्र, हे जयंत पाटील आता अजित पवारांच्या गटात जाणार असल्याची प्रचंड जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ज्याबाबत आता स्वत: अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. ते पुण्यात बोलत होते. (dcm ajit pawar said jayant patil naver meeting with amit shah big statement on ncp politics maharashtra political news in marathi)
जयंत पाटलांबाबत अजित पवारांचं मोठं विधान
पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीबद्दल चर्चा झाली. पण जयंत पाटील भेटले हे धादांत खोटं आहे. ते शरद पवार यांच्याकडे होते. ते भेटले तर सांगितलं असतं, पण ते भेटलेच नाहीत. कारण तसं नसताना बिनबुडाच्या बातम्या का करता?, मी काही मनकवडा नाही.. मी त्यांच्या मनातलं कसं काय सांगू शकतो?’ असं थेट अजित पवार यावेळी म्हणाले.
जयंत पाटील खरंच अमित शाहांना भेटले का?
दोनच दिवसांपूर्वी असं वृत्त समोर आलं की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जे डब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्ये अमित शाह यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या वृत्तानंतर जयंत पाटील हे आता शरद पवारांसोबत की अजित पवारांसोबत, अशी चर्चाही सुरू झाली.
हे ही वाचा >> अमित शाह पुण्यात आल्यानंतर अजित पवारांनी काय केलं कौतुक?
झालं असं की पावसाळी अधिवेशन झालं. त्यानंतर एका चर्चेने डोकं वर काढलं. चर्चा अशी सुरू झाली की, पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता अजित पवारांसोबत जाणार. नंतर असे वृत्त समोर आलं की जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार.