CM फडणवीस, मुंडेंवर हादरवून टाकणारे आरोप करणाऱ्या रणजीत कासलेचा सगळा इतिहासच आला बाहेर, धक्का बसेल असे कारनामे!
Ranjeet Kasale: बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याच्याविरोधात आता एकेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्याने आतापर्यंत नेमकं काय-काय केलं होतं हे आता समोर येत आहे.
ADVERTISEMENT

बीड: बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणात 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेलीय. कासलेनं खुलेआम धनंजय मुंडेंसह अनेकांवर जोरदार आरोप केलेत. अटक केल्यानंतर म्हणा किंवा कोठडीत जाताना कासले अगदी हिरो असल्यासारखा मस्तपणे वावरताना दिसतो. आता पोलिसांना रणजीत कासलेच्या मोबाइलमधील डेटा रिकव्हर करायचा आहे. कारण याच मोबाइलवरुन त्यानं अनेक व्हिडीओ करुन गौप्यस्फोट केले आहेत. शिवाय यामध्ये आर्थिक व्यवहाराची देखील माहिती मिळणार आहेत.
रणजीत कासलेनं केलेले आरोप फारच गंभीर आहेत. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करायचा होता असा खळबळजनक दावाही त्यानं केला होता. हा कासले सध्या फारच चर्चेत आहे. हा नेमका कोण आहे, याचं बॅकग्राऊंड काय आहे हेच आपण जाणून घेऊया.
कोण आहे रणजीत कासले?
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले हा बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सायबर विभागामध्ये कर्तव्यास होता. या अगोदर रणजीत कासले परळी त्याचबरोबर गेवराई आणि मुंबई, छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी कर्तव्यास होता, बीडच्या सायबर विभागामध्ये रणजीत कासलेकडे आर्थिक फसवणुकीची केस तपासा कामी आली होती आणि याच केसमध्ये रणजीत कासलेने आर्थिक देवाण-घेवाण करून गैरव्यवहार केला असा ठपका ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर वरिष्ठांची परवानगी न घेता तपास केल्यामुळे रणजीत कासलेला निलंबित करण्यात आले होते.
हे ही वाचा>> कराडच्या Encounter चा दावा, EVM मशीन आणि मुंडेंवर खळबळजनक आरोप करणारा पोलीस रणजीत कासलेची A to Z माहिती
2014 मध्ये रणजित कासले महाराष्ट्र पोलिसात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाला. रणजित कासलेची पहिली पोस्टिंग मुंबईच्या डी. बी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये होती. जिथे त्यानं 2015 ते 2019 पर्यंत, म्हणजे साडेतीन वर्षे सेवा बजावली.