मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार, ‘पाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांनी आम्हाला…’,

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

manoj jarange patil reply chhagan bhujbal maratha reservation mumbai azad maidan protest maharashtra news
manoj jarange patil reply chhagan bhujbal maratha reservation mumbai azad maidan protest maharashtra news
social share
google news

Manoj jarange Patil Vs Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांच्यातील वाकयुद्द संपण्याचे नावच घेत नाही आहे. आज सकाळीच छगन भुजबळांनी जरांगेंचे शिक्षण काढत त्याच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित केले होते. यावर आता तुमची संस्कृती काय आहे…कोयत्याच्या, कुऱ्हाडीच्या, काठ्याच्या आणि पाय तोडण्याची भाषा करणारे तुम्ही, राज्याला काय संस्कृती शिकवणार? असा सवाल उपस्थित करत जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केला आहे.  (manoj jarange patil reply chhagan bhujbal maratha reservation mumbai azad maidan protest maharashtra news)

माणसाने सुसंस्कृत असले पाहिजे, थोडे शिक्षण कमी असले तरी चालेल, कोणाला कसा मान सन्मान द्यावा. यासाठी सुसंस्कृत असणे गरजेचे असल्याचे विधान करून छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मनोज जरांगेंना (Manoj jarange Patil)  टोला लगावला होता. भुजबळांच्या या टीकेचा आता जरांगेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. भुजबळ जरा सुधरा…सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकावा? काय बरळेल तो माणूस, काय झालं असेल बरं तुम्हाला? महाजन साहेबांना तीनदा सांगितले जाऊद्यांना फाटकून तेही नाही येणार. काय बोलतो एवढा मोठा माणूस, चांगले विचार आहेत तुमचे. तुम्ही मला संस्कृती शिकवावी. संस्कृतीच्या तुमचा अनुभव आणि वयावरून समोर आली. तुमची संस्कृती काय कोयत्याच्या कुऱ्हाडीच्या, काठ्याच्या आणि पाय तोडण्याची भाषा करणारी आहे, तुम्ही काय राज्याला संस्कृती शिकवणार? आणि आमची संस्कृती कशाला काढता? असा सवाल थेट सवालच जरांगेंनी भुजबळांना केला.

हे ही वाचा : Maharashtra Crime : गावातील तरुणासोबत…, त्याने बहिणीचा गळा आवळून जीवच घेतला

तसेच गोरगरीबांचा वापर करून आमच्या मराठा आणि ओबीसीत उगच भांडणे लावता. पण आमचे प्रेम तुटणारच नाही, कितीही प्रयत्न करा. जाऊ द्या, मला त्याला महत्व द्यायचं नाही, असा शब्दात जरांगेनी भुजबळांवर टीका केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मी जर म्हटलं असतं ना चला 25 डिसेंबरला मुंबईला तर लोक दणादणा गेले असते आणि दोन दिवसात माघारी आले असते. राज्यात आणि देशात काही आंदोलने अशी झाली आहेत. ती लाखोंच्या संख्यने एकत्र आली आणि मग मोडली. का मोडली यामागची कारणे बघावी लागतील. भावनेच्या आहारी जाऊन जनता मागे आहे म्हणून काहीही निर्णय़ घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची, समाजाला फसवायचं हे माझ्याकडे होणार नाही, असे जरांगेंनी स्पष्टपणे सांगितले.

हे ही वाचा : Mumbai Crime : चित्रपटात काम देतो म्हणून मुलीला मुंबईत आणले, अंधेरीतील हॉटेलमध्ये…

आमच्याकडे दोन पर्याय आहेत. आम्ही शेतकरी सुद्धा आहोत. इथे कापसे वेचायला जवळ आली आहेत. गहू आणि ज्वारीचेही पिक आले आहे. यांना एक एक पाणी दिले तर संपूर्ण पीक आमच्या पदरात पडेल. आता या 10 ते 20 दिवसात कापसे वेचली. तर आमच्या पदरात 70 टक्के पीक पडतंय. मग राहिलेली 20 ते 30 टक्के कामे सहज शक्य होतील. मला त्यांचा मागचा विचार करणे गरजेचे आहे. मराठा इकडची काम उरकून तिकडे लढायला निघणार आहे. म्हणून आम्हाला वेळ पाहिजे, सरकारला एक घंटा दिला नाही आणि देणार सुद्धा नाही,अशी भूमिका देखी जरांगेंनी मांडली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT