‘मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका’, नारायण राणेंचे धक्कादायक विधान

ADVERTISEMENT

maratha reservation narayan rane big statement on obc certificate manoj jarange patil agitation
maratha reservation narayan rane big statement on obc certificate manoj jarange patil agitation
social share
google news

जालन्याच्या आंतरवली सराटी गावात जाऊन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे पाटलांना (Manoj jarange Patil) ज्युस पाजून त्यांचे उपोषण सोडले आहे. तब्बल 17 दिवसांनी जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले आहे. जरांगे पाटलांनी उपोषण सोडण्याच्या काही तासातच केद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मोठं विधान केले आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये. तसेच सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही, असे धक्कादायक विधान नारायण राणे यांनी केली आहे. (maratha reservation narayan rane big statement on obc certificate manoj jarange patil agitation)

नारायण राणेंची (Narayan Rane) पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर भाष्य केले. मराठा आरक्षणाची मागणी जुनी आहे. यापुर्वी मराठ्यांना 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय़ झाला आणि पुढे प्रकरण कोर्टात गेल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

हे ही वाचा : Bademiya: हे काय… मुंबईतील प्रसिद्ध ‘बडेमिया’च्या किचनमध्ये उंदीर-झुरळं, FDA ही अवाक्

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये.तसेच हा निर्णय घेताना सरकारने घटनेतील कलम 15/4 आणि 16/4 चा अभ्यास करावा, असे नारायण राणे यांनी सांगितले. तसेच सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही. त्यामुळे सरसकट याचा विचार करण्यापेक्षा घटनेतील सामाजिक आणि आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणाचा सर्व्हे व्हावा,अशी मागणी नारायण राणे यांनी यावेळी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात 38 टक्के मराठा समाज हा गरीब आहे, ज्यांना शैक्षणिक पात्रताही मिळवता आली नाही.त्यामुळे पैशाअभावी आणि आर्थिक स्थिती पाहून मराठा समाजातील वर्गाला आरक्षण देण्यात यावं , असे देखील नारायण राणे म्हणाले आहेत.

नारायण राणे यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्यावरही भाष्य केले आहे. कोणत्याही इतर समाजाचं आरक्षण काढाव आणि दुसऱ्याला समाजाला द्याव या मताचा मी नाही, असे विधान करून नारायण राणे यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्याला विरोध केला. कोणत्याही समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्यांना द्याव, असे होता कामा नये, असे देखील नारायण राणे म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Nanded Crime : जवानाने गरोदर पत्नीसह 4 वर्षाच्या चिमुकलीचा घेतला जीव! कारण जाणून पोलिसही चक्रावले

    follow whatsapp

    ADVERTISEMENT