Rajendra Gudha : अशोक गेहलोत सरकारला हादरवून सोडणाऱ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Rajendra Singh Gudha join Eknath Shinde shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी राज्यभरात पक्षवाढीला सुरुवात केली. महाराष्ट्रासह शिंदेंनी आता इतर राज्यावरही लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज राजस्थानचे निलंबित मंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र गुढा यांनी शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला. राजेंद्र गुढा यांनी राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारला हादरवून सोडले होते. इतकंच नाही तर लाल डायरीमुळे ते चर्चेत आले होते. आता हे राजेंद्र गुढा कोण आहेत, हे जाणून घेऊयात. (rajendra singh gudha join eknath shinde shivsena rajastha ashok gehlot government)

ADVERTISEMENT

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या जयपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गटात)  राजस्थानचे निलंबित मंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र गुढा यांनी प्रवेश केला. खरं तर राजेंद्र गुढा यांचा मुलगा शिवम गुढा यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिंदे त्यांच्या गावी आले होते. यावेळी राजेंद्र गुढाच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

लाल डायरीमुळे चर्चेत

राजस्थान सरकारच्या मंत्रिमंडळातून बरखास्त केल्यानंतर राजेंद्र गुडा 24 जुलै रोजी ‘लाल डायरी’ घेऊन विधानसभेत पोहोचले होते. या डायरीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरील आरोपांची संपूर्ण यादी असल्याचा दावा गुढा यांनी केला होता. त्या दिवशी त्यांना सभागृहाबाहेर हाकलण्यात आले होते. तसेच काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांनी ती डायरी त्यांच्याकडून हिसकावून घेतल्याचे गुढा यांनी सांगितले होते.

हे वाचलं का?

…म्हणून मंत्रीपदावरून हकालपट्टी

21 जुलै रोजी विधानसभेत मणिपूरमधील घटनेवर काँग्रेस भाजपला प्रश्न करत असताना राजेंद्र गुढा यांनी आपल्याच सरकारला सवाल केला होता. महिलांच्या सुरक्षेत आपण अपयशी ठरलो हे खरे आहे, पण राजस्थानमध्ये ज्याप्रकारे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, त्याकडे मणिपूरऐवजी आपल्या राज्यातील परिस्थिती पाहिली पाहिजे, असे विधान करून गुढा यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला होता. मुख्यमंत्री पायाला पट्टी बांधून बसले आहेत, गृहखाते सक्षम व्यक्तीकडे असते तर काम झाले असते,असे विधान करून त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या एका विधानानंतर राजेंद्र गुढा यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

कोण आहेत राजेंद्र गुढा?

राजस्थानच्या झुंझुन जिल्ह्यातील उदयपूरवाटी मतदारसंघातून राजेंद्र हे आमदार आहे. त्यांच्या गावाचे नाव गुढा आहे. त्यामुळे राजेंद्र यांनी त्यांच्या गावाचे नाव जोडून त्यांचे नाव राजेंद्र गुढा केले होते. 2018 च्या निवडणुकीत राजेंद्र गुढा बहुजन समाज पक्षाच्या (BSP) तिकिटावर दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2020 मध्ये जेव्हा सचिन पायलट आपल्या समर्थक आमदारांसह हरियाणातील मानेसरला गेले तेव्हा सीएम गेहलोत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या नेत्यांपैकी राजेंद्र गुढा यांचा समावेश होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT