Lok Sabha Election 2024 : "संज्या, नटरंगी नाच्या...", भाजप आमदार राऊतांवर प्रचंड संतापला

मुंबई तक

ADVERTISEMENT

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी खासदार संजय राऊत यांना इशारा दिला.
प्रसाद लाड यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हीन भाषेत टीका केली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची टीका

point

संजय राऊत यांना का म्हणाले नटरंगी नाच्या?

point

मोदींवरील टीकेनंतर भाजप आमदार चिडले

Prasad Lad Sanjay lad : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपचे आमदार प्रसाद लाड प्रचंड संतापले. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर केलेल्या टीकेला उत्तर देताना लाड यांनी संजय राऊतांचा एकेरी भाषेत उल्लेख करत नाच्या म्हटले. (MLA Prasad Lad warned MP Sanjay Raut)

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू असून, आता प्रचारातील भाषेची पातळी खालावताना दिसत आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना अभिनेते जॉनी लीवर यांच्याशी केली. त्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. 

प्रसाद लाड संजय राऊतांबद्दल काय बोलले?

आमदार लाड यांनी एका व्हिडीओतून भूमिका मांडली. यात ते म्हणतात, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हीन भाषेत टीका करणारा संजय राऊत नावाचा नाच्या... याला माहीत नाहीये की, या देशातील १३० कोटी जनतेचा स्वाभिमान जर कोण असेल, तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत."

हे वाचलं का?

हेही वाचा >> उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण उतरणार मैदानात? 

"सकाळी उठून... लिपस्टिक पावडर लावून... टीव्हीवर येऊन... काहीही घृण भाषेत बोलायचं.... देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करायचा. अरे नटरंगी नाच्या, या महाराष्ट्रातील, देशातील जनता तुला चपलेने तोंड फोडल्याशिवाय, तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. अशा प्रकारची हीन कृत्ये जर संजयजी तुम्ही परत केलीत, तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही. संज्या तुला मी सांगतो, तुला मी सोडणार नाही", असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला. 

संजय राऊतांनी मोदींबद्दल काय विधान केले?

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरठ येथील भाजपच्या सभेत म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. मोदींनी हा सर्वात मोठा जोक केला आहे."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "पुरंदरचा मांडवली सम्राट"; विजय शिवतारेंवर सडकून टीका, पत्र व्हायरल

राऊत पुढे म्हणाले, "ते दररोज असा एक विनोद करत आहेत. त्यांचे विनोद ऐकले की वाटतं, देशात जॉनी लीवरनंतर (प्रसिद्ध विनोदी अभिनेते) कोणी मोठा विनोदी कलाकार असेल तर ते मोदी आहेत. हा गुजरातचा लीवर आहे, जो आमचं मनोरंजन करतोय", अशा शब्दात राऊतांनी मोदींची खिल्ली उडवली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT