CM शिंदेंविरुद्ध थोपटले दंड! आदित्य ठाकरे कोणत्या मतदारसंघातून देऊ शकतात आव्हान, हे आहेत पर्याय

ADVERTISEMENT

Shiv Sena (UBT) leader Aditya Thackeray has challenged Chief Minister Eknath Shinde saying that he will contest and win the election from Thane
Shiv Sena (UBT) leader Aditya Thackeray has challenged Chief Minister Eknath Shinde saying that he will contest and win the election from Thane
social share
google news

शिवसेना (UBT) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान दिलं आहे. थेट ठाण्यातून निवडणूक लढविणार आणि जिंकणार असा निर्धार ठाकरे यांनी बोलून दाखविला आहे. काल (बुधवारी) ठाण्यात रोशनी शिंदे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध म्हणून पार पडलेल्या जनप्रक्षोभ मोर्चामध्ये त्यांनी ही घोषणा केली. यापूर्वीही त्यांनी ठाण्यातून निवडणूक लढविण्याबाबत भाष्य केलं आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे खरंच ठाण्यातून निवडणूक लढविणार का हा प्रश्न विचारला जात आहे. (Shiv Sena (UBT) leader Aditya Thackeray has challenged Chief Minister Eknath Shinde saying that he will contest and win the election from Thane.)

आदित्य ठाकरे कोणत्या मतदारसंघातून मैदानात उतरणार?

आदित्य ठाकरे ठाण्यातून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत? पण नेमकं काय आहे ठाण्यातील चित्र? ठाणे शहरात सध्या ठाणे शहर, ओवळा-माजीवडा आणि कोपरी-पाचपाखडी असे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी 2 शिवसेना तर 1 भाजपकडे आहे. मात्र या तिन्ही मतदारसंघांवर शिवसेनेचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात दिसून येते.

ठाणे शहर :

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघावर मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता होती. 1990 पासून 2004 पर्यंत इथून मोरेश्वर जोशी आमदार होते. तर 2004 ला एकनाथ शिंदे पहिल्यांदा इथूनच आमदार झाले. 2009 ला मतदारसंघाची पुनरर्चना झाल्यानंतर शिंदे यांनी कोपरी-पाचपाखडीची निवड केली तर इथून राजन विचारे आमदार झाले. पुढे 2014 मध्ये राजन विचारे खासदार झाले. पुढे 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपाच्या मुद्द्यांवरुन शिवसेना-भाजपची युती तुटली. दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री! आयुक्तांनी सादर केला अहवाल

त्यावेळी या मतदारसंघातून शिवसेनेने रवींद्र फाटक यांना तिकीट दिले. तर भाजपने संजय केळकर यांना मैदानात उतरवलं. संजय केळकर यांनी ताकद लावून रवींद्र फाटक यांना पराभूत करुन हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आणला. 2014 साली संजय केळकर यांनी रवींद्र फाटक यांचा 12 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. तेव्हा केळकर यांना 70 हजार मत मिळाली तर फाटक यांना 58 हजार मत मिळाली.

त्यानंतर 2019 मध्येही हा मतदारसंघ भाजपकडेच राहिला. तेव्हा मनसेच्या अविनाश जाधव यांचा 19 हजार मतांनी पराभव करुन केळकर दुसऱ्यांदा आमदार झाले. पण 2019 मध्ये शिवसेना-भाजपने एकत्र निवडणूक लढवूनही 2014 च्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये किंवा मताधिक्यामध्ये फारशी वाढ झाली नाही. भाजपला 92 हजार मत मिळाली. तर दुसऱ्या बाजूला मनसेच्या मतांमध्ये कमालीची वाढ झाली. 2014 मध्ये मनसेला अवघी 8 हजार मत होती. तर 2019 मध्ये अविनाश जाधव यांनी 72 हजार मत घेत केळकर यांना विजयासाठी संघर्ष करायला लावला होता.

ADVERTISEMENT

ओवळा माजिवडा :

2009 च्या आधी ठाणे आणि बेलापूर हे दोन मोठे विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात होते. मात्र 2009 ला या दोन्ही मतदारसंघाचे विभाजन करण्यात आले आणि पुनर्रचनेत ओवळा-माजिवडा मतदारसंघ तयार झाला. तेव्हापासून म्हणजेच 2009 पासून प्रताप सरनाईक शिवसेनेकडून सातत्याने निवडून येत आहेत. मात्र या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांचीही निर्णायक भूमिका बजावणारी आकडेवारी आहे. 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 20 ते 25 टक्के मत मिळाली होती.

ADVERTISEMENT

‘बावन’ आणे, कमळबाई आणि शिंदेंचे शाप; शिवसेनेचा (UBT) भाजपवर घणाघात

2008 साली प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केला आणि 2009 ला त्यांना ओवळा-माजिवडामधून तिकिट मिळाले. त्यावेळी प्रताप सरनाईक यांनी 9 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळविला. 2014 सालीही शिवसेना, भाजपने वेगवेगळी निवडणूक लढवली.
भाजपच्या संजय पांडे यांनी प्रताप सरनाईक यांना चुरशीची लढत दिली. मात्र दहा हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने प्रताप सरनाईक निवडून आले. 2019 मध्ये तर प्रताप सरनाईक तब्बल 84 हजारांच्या मताधिक्याने आमदार झाले. भाजप आणि शिवसेना युतीचा सरनाईक यांच्या मताधिक्याला मोठा फायदा झाला.

कोपरी-पाचपाखडी :

कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघावर 2009 पासून एकनाथ शिंदे यांनी पकड मिळवली आहे. ते तिसऱ्यांदा इथून आमदार झाले आहेत. तसेच त्यांच्या मताधिक्यामध्येही सातत्याने वाढ होतं गेली आहे. 2009 मध्ये एकनाथ शिंदेंना केवळ 32 हजारांचं मताधिक्य मिळालं होतं. तर 2014 साली भाजप-शिवसेना स्वतःत्र लढूनही शिंदे यांना 52 हजारांचं मताधिक्य मिळालं होतं. 2014 मध्ये भाजपच्या संदीप लेले यांना 48 हजार मत मिळाली होती. तर शिंदे यांना 1 लाख मत मिळाली होती.

2019 मध्ये तर शिंदे यांना तब्बल 89 हजारांचं मताधिक्य मिळालं होतं. शिंदे यांना 1 लाख 13 हजार मत मिळाली होती. तर विरोधातील काँग्रेस उमेदवाराला अवघी 24 हजार मत मिळाली होती. असं म्हणतात की मागील 8 ते 10 वर्षांच्या काळात कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी राजकीय विरोधकच शिल्लक ठेवले नाहीत. शिवाय शिंदे यांच्या तोडीचा एखादा स्थानिक मोठा नेताही या मतदारसंघात दिसून येत नाही.

“ठाण्यातून लढणार अन् जिंकूनही येणार!” शिंदेंच्या बालेकिल्ल्यातूनच ठाकरेंनी दिलं आव्हान

आदित्य ठाकरे ठाणे शहराची निवड करणार?

दरम्यान, आदित्य ठाकरे ठाणे शहर मतदरासंघाचा पर्याय निवडू शकतात का असा प्रश्न वरील आकडेवारी पाहिल्यास पडतो. याच कारणही तसंच आहे. ओवळा-माजिवडा आणि कोपरी-पाचपाखडी या मतदरासंघामध्ये शिवसेनेप्रमाणेच सरनाईक आणि शिंदे या दोघांचेही वैयक्तित प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत ठाणे शहरात भाजपचा आमदार आहे. मात्र मताधिक्याचे प्रमाण तोकडे आहे. शिवाय शिवसेनेचे प्राबल्यही मोठे आहे. राजन विचारे खासदार झाले तेव्हा त्यांना इथून सर्वाधिक लीड मिळाले होते. त्यातच आदित्य ठाकरे यांच्यासारखा नेता आल्यास ठाण्याची जनताही त्यांचा विचार करु शकते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT