शिरसाटांचं ‘ते’ विधान अन् सुषमा अंधारेंच्या डोळ्यात आलं पाणी, दाटलेल्या कंठाने म्हणाल्या…
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंवर टीका करताना शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी “ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ . काय काय लफडे केले तिने काय माहीत नाही”, असं विधान केलं होतं. त्यांच्या याच विधानावर बोलताना सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले.
ADVERTISEMENT

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंवर टीका करताना शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी “ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ . काय काय लफडे केले तिने काय माहीत नाही”, असं विधान केलं होतं. त्यांच्या याच विधानावर बोलताना सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले. ‘मुंबई Tak बैठक’मध्ये बोलताना सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांच्यावरही निशाणा साधला.
भाजप नेत्या दिव्या ढोले यांच्या एका प्रसंगावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “तुम्ही चहाला गेल्यावर लोकांना खटकलं. मी तर दादा भाऊ म्हटल्यावर लोकांना झोंबत. संजय शिरसाट यांना भाऊ म्हटलं तर का राग येतो? आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले तेव्हा त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं की, भाऊ मी सुषमा अंधारे.”
संजय शिरसाट यांच्या विधानामुळे सुषमा अंधारेंच्या डोळ्यात का आलं पाणी?
आमदार संजय शिरसाट यांच्या विधानावर बोलताना सुषमा अंधारे यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, “या सगळ्यात वाईट कशाचं वाटतंय, घाबरून का जाते, तर माझी लेक सहा वर्षांची आहे. तिला फार काही कळणार नाही. पण, हे जे बोललं गेलं आहे, ते लोकांमध्ये राहणार आहेत. जेव्हा माझी लेक मोठी होईल. एवढ्या संघर्षातून आपण येतो. एक गोष्ट अनेक वेळा बोलून झालीये. मी गरीब घरातून आलेय. थोडा कोरडवाहू शेतीचा तुकडा आहे. भाऊ तिथे काम करतो. मी इकडे काहीतरी सिद्ध करायला आले आहे”, असं बोलताना सुषमा अंधारेंचा कंठ दाटून आला.
हेही वाचा >> ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य’; देवेंद्र फडणवीसांचं ‘मुंबई Tak बैठक’मध्ये मोठं भाकित
“मी निवडणूक लढवणार हे अजूनही माझ्या डोक्यात नाही. एका भल्या माणसावर अन्याय होतो, मग संजय राऊत असतील, अनिल देशमुख असतील. पण, फार बेधडकपणे मांडलं पाहिजे. यासाठी मी राजकारणात आलेय. गरीब माणसाकडे जपण्यासारखं काय असतं, ईडीपासून लपवण्यासारखे पैसे नाहीत माझ्याकडे. सीबीआयपासून लपवण्यासारखं ओझं माझ्याकडे नाही. कुठल्याही पोलीस स्टेशनला माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मी विलास देशमुखांच्या महाविद्यालयात शिकले आहे. तेव्हापासून मी मुख्यमंत्रीपद जवळून बघितलं आहे. पण, कुठल्याही विभागात माझा अर्ज नाही”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.