Yashomati Thakur : ‘तू चोट्टा, तुझी बायको चोट्टी’ त्या आरोपावर यशोमती ठाकुर राणांवर भडकल्या
Yashomati Thakur : अमरावतीमध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार यशोमती ठाकुर यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. त्यानंतर यशोमती ठाकुर यांनी औकत काढत सिद्ध करुन दाखवण्याचं आव्हान केले आहे.
ADVERTISEMENT
Yashomati Thakur : राज्यातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी गाजत असतानाच आता खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार यशोमती ठाकुर यांच्यामध्ये जोरदार वाद रंगला आहे. तिवसामध्ये दहीहंडी कार्यक्रमामध्ये नवनीत राणा यांनी थेट यशोमती ठाकुर यांच्यावर आरोप केले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ताईंनी आमदार रवी राणा (MLA Ravee Rana) यांच्याकडून कडक नोटा घेतल्या आणि प्रचार दुसऱ्याचा केला. सगळी मतं ही विरोधकांना दिली, त्यांनी इमानदारीची भाषा करु नये अशी जहरी टीका खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकुर यांच्यावर केली.
ADVERTISEMENT
…तर राजकारण सोडून देऊ
खासदार नवनीत राणा यांनी यशोमती ठाकुर यांच्यावर टीका करताच राणा यांना यशोमती ठाकुर यांनीनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी संतप्त होत त्यांनी सिद्ध करुन दाखव म्हणत त्यांनी साल्या हरामखोर नाही तर राजकारण सोडून देऊ असं त्यांनी थेट आव्हानही दिले आहे.
हे ही वाचा >> Supriya Sule : कंत्राटी मेगाभरतीवरुन सरकारला सुप्रिया सुळेंनी धरले धारेवर, आरक्षणावरूनही डागली तोफ
आजही शेती विकावी लागते
यशोमती ठाकुर यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या की, शाहाण्या म्हणावं लायकीत राहा. माझ्या बापाने आणि कुटुंबाने इथं जमिनी देण्याचं काम केलं आहे, घेण्याचं नाही. आजही निवडणुकीत एखादी एकर शेती विकावी लागते ही फॅक्ट असल्याचे सांगत त्यांनी राणांसारखी फालतुगिरी सहन करणार नाही अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हे वाचलं का?
भाजपमध्ये जाणार होत्या
राधाकृष्ण विखे पाटील हेही भाजपात गेले तेव्हा त्यांचेही नाव यादीत होते असा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला होता. त्यावर त्यांनी आक्रमक होत राणांनी औकातीत राहण्याचा इशारा दिला आहे.
हे ही वाचा >> Ganpat Gaikwad : शिवसेना-भाजपत ठिणगी, थेट एकनाथ शिंदे-श्रीकांत शिंदेंवर आरोप
वहिणीचं प्रमाणपत्र खोटं निघालं
आमदार यशोमती ठाकुर यांच्यावर कडक नोटा घेतल्या असल्याची टीका केल्यानंतर यशोमती ठाकुर म्हणाल्या की, उगाच काहीही अफवा पसरवायच्या नसतात. आम्ही ताईला वहिणी म्हणून स्विकारलं होतं. त्यांना निवडून आणण्यासाठी दारोदार फिरलो. पण वहिणीचं प्रमाणपत्र खोटं निघालं. त्या स्वतः चोर निघाल्या, त्यामुळे राणांनी औकातीत रहावं अशा संतप्त शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT