सुषमा अंधारेंवर आरोप, जाधवांची हकालपट्टी! ठाकरेंनी ठरवला बीडचा जिल्हाप्रमुख - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / सुषमा अंधारेंवर आरोप, जाधवांची हकालपट्टी! ठाकरेंनी ठरवला बीडचा जिल्हाप्रमुख
बातम्या राजकीय आखाडा

सुषमा अंधारेंवर आरोप, जाधवांची हकालपट्टी! ठाकरेंनी ठरवला बीडचा जिल्हाप्रमुख

thackeray group remove appasaheb jadhav from district post ratnakar shinde beed new district chief

Ratnakar Shinde is a Beed New District Chief : बीड : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्यावर गंभीर आरोप करणे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांना चांगलेच भोवले आहे. कारण ठाकरे गटाने आप्पासाहेब जाधव यांची जिल्हाप्रमुख (पूर्व) पदावरून हकालपट्टी केली आहे. तर आता त्यांच्या जागी केजचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे (Ratnakar Shinde) यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आप्पासाहेब जाधव यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान आता बीडच्या जिल्हाप्रमुख पदी वर्णी लागलेले रत्नाकर शिंदे नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (thackeray group remove appasaheb jadhav from district post ratnakar shinde new district chief)

आप्पासाहेब जाधवांना ‘ते’ विधान भोवलं

उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्या नेतृत्वात राज्यभर महाप्रबोधन यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेचा बीडमध्ये 20 मे रोजी समारोप झाला. मात्र बीडमधील यात्रेपूर्वी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांनी अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पैसे मागत असून, दादागिरी करणाऱ्या अंधारेंना आपण दोन चापटा मारल्याचा दावा जाधव यांनी केला होता. मात्र प्रसिद्धीसाठी काही लोक स्टंट करत असल्याचे विधान करून अंधारे यांनी हा आरोप खोडून काढला होता. या घटनेची गंभीर दखल पक्षाने घेत आप्पासाहेब जाधव यांची जिल्हाप्रमुख पदासह पक्षातून हकालपट्टी केली होती.

जिल्हाप्रमुख पदाच्या शर्यतीतील नावे

आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्यानंतर हे पद सध्या रिक्त होते. या पदासाठी ठाकरे गटाकडून चांगला चेहरा शोधला जात होता. त्यामुळे जिल्हाप्रमुख पदाच्या शर्यतीत केजचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, परळीचे व्यंकटेश शिंदे आणि वडवणीचे माजी तालुका प्रमुख विनायक मुळे यांची नावे आघाडीवर होती. तर माजलगावचे माजी तालुका प्रमुख सतिश सोळंके, अंबाजोगाईचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी यांच्याही नावाची चर्चा होती. पण पक्षाने रत्नाकर शिंदे (Ratnakar Shinde) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. शिंदे यांच्या निवडीचे आता सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहेत.

सर्कल प्रमुख ते जिल्हा प्रमुख… कोण आहेत रत्नाकर शिंदे?

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील ग्रामीण भागातील पिंपळगावचे रत्नाकर शिंदे (Ratnakar Shinde) आहेत.1990 ला त्यांनी त्यांच्या गावात शिवसेनेची शाखा स्थापन केली. त्यावेळी ते गावातील शाखेचे सर्कल प्रमुख होते. त्यानंतर त्यांना तालुका सचिव पद देण्यात आले आणि त्याचे केज शहरात आगमन झाले. 2004 ला शिंदे यांच्यावर केज तालुका प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. रत्नाकर शिंदे यांच्यावर पक्षाचे काम करत असताना गुन्हे दाखल झाले आणि झोपडपट्टी कायद्याखाली देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.काही काळ पक्षाकडून त्यांना थांबवल देखील, मात्र त्यांनी कसल्याही प्रकारची धरसोड न करता ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. याच एकनिष्ठ राहण्याचे फळ त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने जिल्हा प्रमुख पद बहाल करून दिले.

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!