7th November 2024 Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण! ग्राहकांची झाली मज्जा, 24 कॅरेटचा भाव किती?
Maharashtra Gold Price 7-11-2024 : दिवाळी संपताच सोन्याच्या दागिन्यांची झळाळी ही झटपटीने कमी झाली. दिवाळी म्हटली की लोक आर्वजून सोन्याचे दागिने खरेदी करतात म्हणून सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दिवाळी संपताच सोन्याच्या दागिन्यांची झळाळी झटपटीने कमी
आज सोन्याच्या किंमतीत मोठा बदल
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
Gold Rate Down in Maharashtra : दिवाळी संपताच सोन्याच्या दागिन्यांची झळाळी ही झटपटीने कमी झाली. दिवाळी म्हटली की लोक आर्वजून सोन्याचे दागिने खरेदी करतात म्हणून सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र, दिवाळीनंतर आज (7 November 2024) सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे. सोनं-चांदीच्या भावातील ही घसरण किती रूपयांनी झाली आहे चला सविस्तर जाणून घेऊया. (Gold-Silver prices Settled down today 7 november 2024 what are the rates of 24 22 and 18 carat gold in Mumbai Pune nashik)
ADVERTISEMENT
देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 80 हजार रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
हेही वाचा : Sanjay Raut : "सदा खोतच्या बापानेच...", शरद पवारांवरील टीकेनंतर राऊत भडकले, हसण्यावरुन फडणवीसांवरही बरसले
24 Carat Gold Rate little Cheaper after Diwali: वेबसाईटनुसार, बुधवार (7 नोव्हेंबर 2024) 24 Carat 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 80,350 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 1,432 रूपयांनी घट झाली असून याची किंमत 78,560 रूपये झाली आहे. तर, 22 caratसोन्याचा भाव 73,650 रूपये होता. त्यातही 1,650 रूपयांनी घट झाली असून त्याची किंमत 72,000 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत चक्क 93,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
हे वाचलं का?
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : झुळूक वाऱ्याची अन् चाहुल थंडीची! तुमच्या शहरात आज कसंय वातावरण?
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
10 gm and 22 carat Gold Rate in Mumbai
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,000 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,560 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,910 रूपये आहे.
Gold Price in Pune 24 Carat
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,000 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,560 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,910 रूपये आहे.
22,24,18 carat Gold Rate in Nagpur
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,000 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,560 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,910 रूपये आहे.
Latest Gold Rate in Nasik
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,030 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,590 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,940 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT