त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न?, फडणवीसांकडून थेट SIT चौकशीचे आदेश

साहिल जोशी

Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिरात एका समुदायाकडून घुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना 13 मे रोजी घडली होती. ज्याबाबत आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट SIT चौकशीचे आदेश दिले आहेत.

ADVERTISEMENT

in maharashtra try to force entry into trimbakeshwar temple direct sit probe ordered by devendra fadnavis
in maharashtra try to force entry into trimbakeshwar temple direct sit probe ordered by devendra fadnavis
social share
google news

Trimbakeshwar Temple Issue: त्र्यंबकेश्वर: महाराष्ट्रातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) गतवर्षीप्रमाणे यंदाही इतर समुदायातील तरुणांनी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. दोन दिवसांपूर्वी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार आता याबाबत सतर्क झालं आहे.

नाशिक पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती.

पोलिसांनी 5 तरुणांना केली अटक

त्याचबरोबर या प्रकरणी नाशिक पोलिसांनी पाच तरुणांना ताब्यात घेतले आहे. नाशिकचे आयजी बीजी शेखर यांनी सांगितले की, ‘त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. ही घटना 13 मे रोजी घडली होती. 10 ते 12 तरुणांनी जबरदस्तीने मंदिरात प्रवेश केल्याची माहिती मंदिर ट्रस्टकडून पोलिसांना मिळाली. त्यांच्याकडे चादर आणि फुलांचे गुच्छ होते.’

हे वाचलं का?

    follow whatsapp