'तुझी मुलगी मेली..', आधी मुलांसमोर बायकोचा ओढणीने गळा आवळून खून अन् नंतर सासूला कॉल; कारण काय?

मुंबई तक

Crime News : नशेच्या आहारी गेलेल्या एका पतीने आपल्या पत्नीची ओढणीने गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. शालू (30) असे मृत महिलेचे नाव असून, आरोपी पती अरुण याने शुक्रवारी (20 मार्च) उशिरा रात्री हे कृत्य केले. विशेष म्हणजे, ज्या मुलांच्या भविष्यासाठी शालू कष्ट करत होती, त्याच सात आणि पाच वर्षांच्या मुलांसमोर अरुणने हे टोकाचे पाऊल उचलले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तुझी मुलगी मेली..

point

आधी मुलांसमोर बायकोचा ओढणीने गळा आवळून खून अन् नंतर सासूला कॉल

point

कारण काय?

Crime News : नशेच्या आहारी गेलेल्या एका पतीने आपल्या पत्नीची ओढणीने गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. शालू (30) असे मृत महिलेचे नाव असून, आरोपी पती अरुण याने शुक्रवारी (20 मार्च) उशिरा रात्री हे कृत्य केले. विशेष म्हणजे, ज्या मुलांच्या भविष्यासाठी शालू कष्ट करत होती, त्याच सात आणि पाच वर्षांच्या मुलांसमोर अरुणने हे टोकाचे पाऊल उचलले. हत्येनंतर सकाळी आरोपीने स्वतः सासूला फोन करून 'तुमची मुलगी मेली आहे' असे सांगत पळ काढला. हरियाणातील कैथल मधील ही घटना आहे.

दारु आणि अफूचे व्यसन

मृत शालू ही मूळची पंजाबमधील बठिंडा येथील असून 2018 मध्ये तिचे लग्न अरुणशी झाले होते. मात्र त्यानंतर नवऱ्याच्या त्रासाल कंटाळून ती माहेरी निघून गेली होती. शालूची आई सुनीता यांनी सांगितले की, मुलाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त पूजेचे कारण सांगून अरुणने आठवड्यापूर्वीच तिला सासरी बोलावले होते. अरुणला दारू आणि अफूच्या नशेचे व्यसन होते, ज्यासाठी तो वारंवार शालूला पैशांची मागणी करत मारहाण करायचा. शालू मजुरी करून आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत होती, मात्र अरुणच्या जाचाने अखेर तिचा बळी घेतला.

हे ही वाचा : अशोक खरातचा आणखी एक किळसवाणा व्हिडीओ, मुलीला टीशर्ट वर करायला सांगितला अन् पोटावर... VIDEO

चिमुकल्याने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रकार

या घटनेचा प्रत्यक्षदर्शी असलेला पाच वर्षांचा मुलगा वरुण याने अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला. तो म्हणाला की, 'रात्री बाबा मला वारंवार झोपवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांनीच आईचा गळा दाबला.' आरोपीची भावजय दामिनी हिच्यासमोरही अरुणने हत्येची कबुली दिली आणि तिथून फरार झाला. यावेळी अरुण स्वतः घाबरलेल्या अवस्थेत होता आणि त्याने स्वतःलाही दुखापत करून घेतल्याचे दिसून आले. या कृत्यात कुटुंबातील इतर सदस्यांचाही समावेश असल्याचा संशय शालूच्या माहेरच्यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा : अशोक खरात प्रकरण: 2 मित्र, 2 FIR आणि कंबरेजवळ घेतलेले पाय.. खळबळ उडवून देणारी Inside Story

दोन्ही मुलं पोरकी

घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शालूचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला असून, आईच्या तक्रारीवरून आरोपी अरुणविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईच्या मृत्यूनंतर आणि वडिलांवर हत्येचा गुन्हा दाखल झाल्याने 7 वर्षांची मयुरा आणि 5 वर्षांचा वरुण या दोन्ही मुलांच्या भविष्याचा प्रश्न आता गंभीर बनला असून परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp