लग्नाच्या पहिल्याच रात्री शक्तीवर्धक गोळ्या खाऊन पती बनला हैवान, पत्नीचा 7 दिवसांत मृत्यू

मुंबई तक

लग्न झालेल्या एका नवविवाहितेबरोबर लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या गोळ्या खाऊन अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध ठेवल्याने पत्नीचा सातव्या दिवशीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकरणी डॉक्टरांनी अनेक धक्कादायक माहिती सांगितली आहे.

ADVERTISEMENT

up crime vigra
up crime vigra
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शक्तीवर्धक गोळ्या खाऊन पती बनला हैवान

point

अनैसर्गिक शरीर संबंधामुळे नवविवाहितेचा आठव्या दिवशीच मृत्यू

point

पतीच्या अत्याचाराने पत्नीचा मृत्यू

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमधील हमीरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या गोळ्या खाऊन संबंध ठेवल्याने दुर्देवी घटना घडली आहे. लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी गोळ्या (Pills for sexual enhancement) खाऊन नवविवाहितेशी शरीर संबंध ठेवल्याने पत्नीचा सातव्या दिवशी मृ्त्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. 

 पत्नीची तब्बेत गंभीर

लग्नाच्या रात्री नवऱ्याने सेक्स वाढवण्यासाठी गोळ्या खाऊन अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध ठेवल्याने पत्नीची तब्बेत गंभीर झाली होती. त्यानंतर पत्नीला कानपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

शरीरसंबंधाने बिघडली प्रकृती

शारीरिक परिस्थिती बिघडलेल्या नवविवाहितेला 7 फेब्रुवारी रोजी तिची तब्बेत बिघडल्याने तिला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिची प्रकृती अधिक बिघडत गेली व शनिवारी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

आरोपी फरार

या प्रकरणी सासरच्या लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नवविवाहितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. मात्र नवऱ्याने घराला बंद करून गाव सोडून त्याचे कुटुंब फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

भावाची पोलिसात धाव

मृत महिलेचे 3 फेब्रुवारी रोजी उराईमधील एका व्यक्तीबरोबर लग्न झाले होते. सरकारी नोकरी असल्याने तिच्या भावानेही मोठ्या थाटामाटात 4 फेब्रुवारी रोजी बहिणीचे लग्न लावून दिले होते. त्यानंतर तिला सासरी पाठवण्यात आले होते. 

अनैसर्गिक पद्धतीनं शरीर संबंध

लग्न झाल्यानंतर  लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी गोळ्या घेऊन त्याने पत्नीबरोबर अनैसर्गिक पद्धतीन शरीर संबंध ठेवले होते. तिच्यावर अत्याचार केल्यामुळे तिची परिस्थिती गंभीर झाली होती. त्यामुळे नवविवाहितेची प्रकृतीही खालावली होती. 

अत्याचारापेक्षाही भयंकर

नवविवाहितेची परिस्थिती अधिक नाजूक झाल्याने तिला स्त्रीरोग तज्ज्ञांकडे दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की,  सामूहिक अत्याचारापेक्षाही वाईट पद्धतीने तिच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवल्याने तिची प्रकृती अधिक ढासळल्याने त्यामध्येच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

हे ही वाचा >> 'अशोक चव्हाणांसाठी आजही काँग्रेसचे दरवाजे खुले'

हे वाचलं का?

    follow whatsapp