‘घरी ये, मी एकटीच आहे’, मॅसेज मिळताच प्रियकर विवाहितेच्या घरी पोहोचला अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

rajsthan bhilwara woman caught red-handed with her lover villagers got her arrange married
rajsthan bhilwara woman caught red-handed with her lover villagers got her arrange married
social share
google news

देशभरात विवाहबाह्य संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अशीच एक घटना आता राजस्थानच्या (Rajsthan) भीलवाडा (bhilwara) येथून समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाचे विवाहित महिलेवर (Married Women) प्रेम जडले होते. या प्रेमसंबधातून अनेकदा ते एकमेकांना भेटायचे. अशाच एका भेटी दरम्यान महिलेसह प्रियकराला (Boyfriend) तिच्या सासरच्या मंडळींनी रंगेहाथ पकडले होते. रंगेहाथ पकडल्यानंतर या दोघांना गावच्या ग्रामपंचायतीसमोर हजर करण्यात आले. यानंतर ग्रामस्थांनी मिळून या दोघांचे लग्न लावून दिले होते. या लग्नाची आता जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. (rajsthan-bhilwara married woman caught red-handed with her lover villagers got her arrange married)

ADVERTISEMENT

भीलवाडा (bhilwara) जिल्ह्याच्या जहाजपूर उपखंड येथील एका गावातील तरूणाचे दुसऱ्या गावातील महिलेसोबत इंस्टाग्रामवर (Instagram) मैत्री झाली होती. या मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्यानंतर भेटीगाठी सूरू झाल्या होत्या. या दरम्यान ऐक दिवशी महिलेने तरूणाला मेसेज केला, ‘घरी ये,मी आज एकटी आहे’. महिलेने बोलवल्यानंतर तरूण तिच्या घरी पोहोचला होता. या सर्व घटनेची माहिती महिलेच्या (Married Women) सासरच्या मंडळींना आधीच मिळाली होती. त्यानुसार सासरच्या मंडळींनी बाहेर जाण्याचे नाटक करत घरावर पाळत ठेवली. यावेळी तरूण घरी पोहोचताच, त्याला सुनेसोबत रंगेहाथ पकडले.

हे ही वाचा : भिंतीवर डोकं आपटलं, तुटलेल्या बांगड्या तोंडात भरल्या, सासरच्यांकडून सुनेचा छळ

सुनेसोबत तरूणाला पकडल्यानंतर तो पळून जाऊ नये, म्हणून त्याचे हात-पाय दोरीने बांधण्यात आले होते. तसेच सासरच्यांनी तरूणाची चौकशी करायला सुरूवात केली होती. तू कोणाच्या बोलण्यावरून इथे आलास? तरूणाच्या बाजूलाच बसलेल्या महिलेला देखील यावेळी प्रश्न विचारण्यात आले होते. या संपूर्ण घटनाक्रमाचा 2 मिनिटे 25 सेकंदाचा एक व्हिडिओ देखील बनवण्यात आला आहे. या व्हिडिओच्या शेवटी तरूण, मी या महिलेला माझ्यासोबत ठेवून घेईन, तिच्याशी मी लग्न करेन, असे आश्वासन देतानाही दिसत आहे.

हे वाचलं का?

या सर्व घटनेनंतर या तरूणाला आणि महिलेला ग्रामस्थांसमोर देखील नेण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी देखील दोघांची चौकशी केली. यानंतर ग्रामस्थांनी तरूणाला महिलेसह त्याच्या गावी नेले. या दरम्यान तरूणाच्या गावच्या ग्रामपंचायतीला बोलावण्यात आले. यावेळी तरूणाच्या ग्रामपंचायचीसमोर घडलेला किस्सा सांगण्यात आला.यानंतर दोघांची पुन्हा एकदा अनेक प्रश्न विचारण्यात आले. या सर्व घटनेनंतर ग्रामस्थांनी मिळून महिलेचे आणि तरूणाचे लग्न लावून दिले होते. या लग्नाची चर्चा आता जिल्ह्यात रंगली होती.दरम्यान या घटनेत तरूणाचे हात-पाय ग्रामस्थांनी दोरीने बांधले होते. मात्र या प्रकरणी त्याने पोलीस ठाण्यात कोणतीच तक्रार दाखल केली नव्हती.

हे ही वाचा : दारू पार्टी भोवली, तरुणीचा जीवच गेला… अपघात की घातपात?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT