औरंगाबाद: ‘भावाने तिच्या मुंडक्यासोबत सेल्फी काढला आणि…’ किर्तीच्या नवऱ्याने सांगितली थरकाप उडवणारी घटना

मुंबई तक

इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील किर्ती मोटे हिचं हत्याकांड किती भयंकर आहे हे आता हळूहळू समोर येत आहे. फक्त किर्तीने मनाविरुद्ध लग्न केल्याने तिच्या स्वत:च्या आईने आणि अल्पवयीन भावाने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. पण हे एवढ्यावरच थांबलं नाही. तर त्याचं क्रोर्य अधिकच वाढलं. किर्तीच्या पतीने ‘मुंबई Tak’शी बोलताना किर्तीच्या भावाचं कौर्य कितपत गेलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील किर्ती मोटे हिचं हत्याकांड किती भयंकर आहे हे आता हळूहळू समोर येत आहे. फक्त किर्तीने मनाविरुद्ध लग्न केल्याने तिच्या स्वत:च्या आईने आणि अल्पवयीन भावाने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. पण हे एवढ्यावरच थांबलं नाही. तर त्याचं क्रोर्य अधिकच वाढलं.

किर्तीच्या पतीने ‘मुंबई Tak’शी बोलताना किर्तीच्या भावाचं कौर्य कितपत गेलं होतं याबाबतही माहिती दिली. किर्तीची हत्या करुन तिचं मुंडकं तोडल्यानंतर भाऊ तिचं मुंडकं घेऊन बाहेर व्हरंड्यात आला. यावेळी तो एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने मुंडकं हातात घेतलं आणि मोबाइल काढून त्यात बहिणीच्या मुंडक्यासह स्वत:चा सेल्फी काढला.

जाणून घ्या नेमकी काय घटना घडली?

‘त्या दिवशी माझी तब्येत खराब होती.. आम्ही दोघं ना वावरात कांदे खुरपत होतो. तर मी तिला म्हटलं की, मी घरी जातो माझी तब्येत काही बरी नाही. मी घरी जाऊन झोपतो.. तुला जोपर्यंत काम करायचंय तोपर्यंत कर.. नंतर घरी निघून ये. मग मी घरी येऊन झोपलो. थोड्या वेळाने मला घरात कुणीतरी आल्यासारखं वाटलं.’

हे वाचलं का?