Chandrashekhar Bawankule: “मोदींवर तुटून पडण्यासाठी श्वापदांची टोळी”

भागवत हिरेकर

India alliance meeting mumbai : मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची दोन बैठक आहे. या बैठकीचे आयोजन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. यावरून आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

maharashtra bjp president chandrashekhar bawankule hits out at india alliance. bawankule also targets on uddhav thackeray.
maharashtra bjp president chandrashekhar bawankule hits out at india alliance. bawankule also targets on uddhav thackeray.
social share
google news

India alliance Mumbai : इंडिया आघाडीतील पक्षांची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने विरोधकांकडून शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. तर दुसरीकडे भाजपने विरोधकांवर टीकेचे बाण डागले आहेत. इंडिया आघाडीला घमेंडियाची बैठक असं संबोधत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्ला चढवला आहे.

पाटणा, बंगळुरूनंतर आता इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीआधीच विरोधकांनी आघाडीचा लोगो जारी केला. तसेच या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, इंडिया आघाडीच्या या बैठकीवर भाजपने टीका केलीये. चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, “मुंबईत होणारी इंडियाची बैठक नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक आहे. उद्धव ठाकरे ज्याला तुम्ही ‘गरूड झेप’ म्हणत आहात ती गरुड झेप नाही. नरेंद्र मोदीजी यांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांची टोळी आहे.”

हेही वाचा >> PM पदासाठी आघाडीचा संभ्रम… INDIA बैठकीत ‘या’ 8 महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा!

“राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली. कोरोना काळात कोट्यवधीची कंत्राट घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत”, असे म्हणत बावनकुळे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरलं आहे.

तुम्हाला जनता घरी बसवणार -चंद्रशेखर बावनकुळे

“तुम्ही लालूप्रसाद यादवांच्या माध्यमातून मोदीजींच्या ‘नरड्यावर बसण्याचं स्वप्न’ बघा. पण जनता तुमच्या छाताडावर बसेल. तुम्ही मोदीजींना जेवढ्या शिव्या द्याल जनता मोदीजींवर तेवढं जास्त प्रेम करेल. महात्मा गांधीजींनी ‘𝐐𝐔𝐈𝐓 𝐈𝐍𝐃𝐈𝐀’ चा नारा याच मुंबईतून दिला होता. त्यांच्या नाऱ्यामुळे इंग्रजांना देशातून जावं लागलं. आता पुन्हा एकदा तोच ‘𝐐𝐔𝐈𝐓 𝐈𝐍𝐃𝐈𝐀’ चा नारा देऊन तुमच्या सारख्या भ्रष्ट प्रवृत्तींना जनता कायमचं घरी बसवणार आहे”, अशी टीका बावनकुळेंनी केली आहे.

हेही वाचा >> मुंबई TaK चावडी: अजित पवार गटाची ऑफर…रोहित पवारांनी का नकार दिला?

“मोदीजींचा तुमच्या (𝐈.𝐍.𝐃.𝐈.𝐀.) विरोधातील संघर्ष हा स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी नाही तर देश वाचविण्यासाठी आहे. तुम्ही तुमचा ‘परिवार बचाव’ अजेंडा घेऊन बैठका करा. कोट्यवधी देशवासीयांच्या स्वप्नपूर्तीचा अजेंडा घेऊन मोदीजींच देशसेवेचं कार्य अखंड सुरू राहणार आहे”, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp