Sharad Pawar: ‘मोदींचं ते वक्तव्य क्लेशदायक’, पवारांची घणाघाती टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Narendra Modi criticism of Congress and ncp women reservation Bill is wrong, Sharad Pawar criticism, Maharashtra first state country to establish State Women commissions
Narendra Modi criticism of Congress and ncp women reservation Bill is wrong, Sharad Pawar criticism, Maharashtra first state country to establish State Women commissions
social share
google news

Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महिला आरक्षण विधेयक (women reservation bill) मांडल्यानंतर त्यांनी तत्कालीन सरकारवर टीका केली. काँग्रेसवर (congress) टीका करताना काँग्रेसला इतक्या वर्षात महिला आरक्षण विधेयकावर कोणताही निर्णय घेता आला नाही अशी टीका केली. त्यांच्या त्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव त्यांनी निशाणा साधला. त्यावर ते म्हणाले की, त्यांचे हे वक्तव्य आमच्यासाठी क्लेशदायक असल्याचे सांगत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडून चुकीचे सांगितले जात असल्याचे त्यांनी सांगितले. (narendra modi criticism congress and ncp over women reservation bill is wrong sharad Pawar criticism)

ADVERTISEMENT

ओबीसी महिलांनाही संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली असली तरी त्यावेळी घेतलेले निर्णय हे घटनात्मकदृष्टीने घेतलेले निर्णय होते असंही त्यांनी यावेळी सांगितले. महिला आरक्षण विधेयकावरावरून त्यांनी टीका केली असली तरी त्यामध्ये त्यांनी ओबीसी महिलांनाही संधी द्यायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे ही वाचा >> Lalbaugcha Raja 2023: लालबागचा राजा मंडळाचे कार्यकर्ते ‘बडवे’ झाले का?

नाईलजाने पाठिंबा

नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकावर बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, काँग्रेसने नाईलजाने पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांनी हे केलेले वक्तव्य क्लेशदायक असून महिला धोरणाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य नेहमीच आघाडीवर राहिले आहे.

हे वाचलं का?

देशात महाराष्ट्र आघाडीवर

शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी सांगितले की, मी स्वतः मुख्यमंत्री असताना 1993 साली राज्य महिला आयोग स्थापन केले आणि हा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्याच प्रमाणे 1993 साली महिला बाल विकास स्वतंत्र विभाग सुरु करण्यात आला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी टीका केली असली तरी त्यांची ही टीका क्लेशदायक असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा >> Lalbaugcha Raja 2023: लालबागचा राजा मंडळाचे कार्यकर्ते ‘बडवे’ झाले का?

संरक्षण दलात संधी

शरद पवारांनी बोलताना सांगितले की, मी केंद्रीय संरक्षण मंत्री असताना त्यावेळी तिन्ही दलामध्ये महिलांना संधी देण्याचा निर्णय मी घेतला. तिन्ही दलांच्या प्रमुखांनी महिलांना संधी देण्याबाबत तीन ते चार बैठका घेऊनही सकारात्मक निर्णय दिला नाही. त्यामुळे संरक्षण दलाचा मंत्री म्हणून मी महिलांना संरक्षण दलात संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शरद पवारांनी सांगितले. त्यामुळे आज ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी महिला आरक्षणावरुन टीका करतात ती चुकीची असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT