Savarkar row: शरद पवार उद्धव ठाकरेंच्या बाजूने, राहुल गांधींना सुनावलं!
वि.दा. सावरकर वाद : विरोधी पक्षनेत्यांची बैठक काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी दिल्लीत बोलावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधींना सुनावलं. शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेला विरोधी पक्षातील काही नेत्यांनीही पाठिंबा दिला.
ADVERTISEMENT

Sharad pawar Statement on Savarkar Row after Rahul Gandhi’s Remarks : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सावरकरांचा मुद्दा चर्चेत आला आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पर्यायाने उद्धव ठाकरे यांची कोंडी झाल्याची स्थिती आहे. भाजप आणि शिवसेनेने उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले असतानाच दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरेंच्या बाजूने भूमिका घेतली आहे. सावरकर वादाच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवारांनी राहुल गांधींना याबद्दल सुनावलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पवारांनी मांडलेल्या भूमिकेला विरोधी पक्षातील काही नेत्यांनी समर्थन दिलं.
सावरकर मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापू लागलं आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून एकीकडे उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना भाजप-शिवसेनेने राज्यात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणाही केली. दरम्यान, याच मुद्द्यावर दिल्लीत झालेल्या बैठकीत शरद पवारांनी भाष्य केले.
विरोधी पक्षाच्या बैठकीत शरद पवार सावरकर मुद्द्यावर काय बोलले?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सावरकरांबद्दल सुरू असलेल्या वादावर भूमिका मांडली. शरद पवार म्हणाले, “सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नाही. सावरकर माफीवीर म्हणणं योग्य नाही.”
हेही वाचा – भाजप-शिवसेना काढणार ‘सावरकर गौरव यात्रा’; कसं असणार स्वरुप?
पुढे बोलताना पवार म्हणाले, “सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्या मुद्द्यावर चर्चा करूयात.” शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेला अनेक खासदारांनी सहमती दर्शवली.










