शरद पवारांचं वय झालं, रिटायर्ड व्हायला पाहिजे का? उद्धव ठाकरें म्हणतात…
उद्धव ठाकरे यांनी प्रथमच शरद पवार यांच्या वयाबद्दल आणि निवृत्तीबद्दल भाष्य केले आहे. यावेळी ठाकरेंनी अजित पवारांना खडेबोल सुनावले.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray Interview : शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले होते की, रिटायर होणार आहात की नाही? त्यावरून शरद पवार चांगलेच चिडलेले दिसले. माझ्या वयाबद्दल बोलू नका, असा इशारा त्यांनी नंतर दिला. शरद पवारांच्या वयाबद्दल उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली.
आवाज कुणाचा पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका मांडली. संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा उत्तरार्धही प्रकाशित झाला आहे.
संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न केला की, ‘आपण पाहिलं असेल की, हे सगळे राष्ट्रवादीचे आमदार आणि त्यांचे मंत्री… त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शरद पवार यांचे आशीर्वाद घ्यायला परत त्यांच्या दारात गेले…’
त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘माझ्याकडे येण्याची कोणाची हिंमत झाली नाही.’