Parliament Special Session : मोदी सरकारचा मोठा निर्णय! महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी - Mumbai Tak - parliament special session central cabinet approval of women reservation bill - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Parliament Special Session : मोदी सरकारचा मोठा निर्णय! महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी

संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान (Parliament Special Session) मोदी सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची (Central Cabinet) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सुत्रानुसार या बैठकीत, महिला आरक्षण विधेयक (women reservation bill) मंजूर करण्यात आले आहे.
women reservation bill central cabinet approval of women reservation bill

संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान (Parliament Special Session) मोदी सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची (Central Cabinet) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सुत्रानुसार या बैठकीत, महिला आरक्षण विधेयक (women reservation bill) मंजूर करण्यात आले आहे. महिला आरक्षणाच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर आता ते लोकसभेत मांडले जाणार आहे. (parliament special session central cabinet approval of women reservation bill)

गेल्या जवळपास 27 वर्षांपासून प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक आता संसदेच्या पटलावर येणार आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी नेहमीच या महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला आहे. मात्र, महिला कोट्यातील ओबीसी आरक्षणाच्या काही मागण्यांबाबत इतर काही पक्षांनी त्यास विरोध केला होता. आता पुन्हा एकदा अनेक पक्षांनी या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणून मंजूर करण्याची जोरदार बाजू मांडली, मात्र योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सरकारने म्हटले आहे.

हे ही वाचा : ‘सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक, तर अजित पवार…’, गोपीचंद पडळकरांचं सुटलं भान

दरम्यान आकडेवारीनुसार, लोकसभेत महिला खासदारांची संख्या 15 टक्क्यांपेक्षा कमी आहे, तर राज्य विधानसभेत त्यांचे प्रतिनिधित्व 10 टक्क्यांहून कमी महिला करतात. या मुद्द्यावर शेवटची कारवाई 2010 मध्ये करण्यात आली होती, जेव्हा राज्यसभेने गदारोळात विधेयक मंजूर केले होते. त्यावेळी मार्शलने महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही खासदारांची हकालपट्टी केली होती. मात्र, हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ न शकल्याने ते रद्द करण्यात आले होते.

सद्य परिस्थितीत लोकसभेत 78 महिला सदस्य निवडून आल्या आहेत, ज्य़ा एकूण 543 च्या 15 टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने संसदेत शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यसभेतही महिलांचे प्रतिनिधित्व सुमारे 14 टक्के आहे. याशिवाय 10 राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे, यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, ओडिशा, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा आणि पुडुचेरी यांचा समावेश आहे.

दरम्यान आता महिला आरक्षणाच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर आता ते लोकसभेत मांडले जाणार आहे.

हे ही वाचा : Shiv Sena Mlas case : सरन्यायाधीशांचे विधानसभा अध्यक्षांना खडेबोल, समजून घ्या 9 मुद्द्यांमध्ये

 

Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट?