अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात आंब्यांची आरास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

हिंदू धर्मात साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा सण आज साजरा केला गेला. यानिमीत्ताने अष्टविनायकापैकी एक मानल्या जाणाऱ्या मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात आंब्याची आरास केली आहे.

हे वाचलं का?

श्रींच्या दुपारच्या पुजेनंतर आंब्याची सुंदर आरास करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

त्यामुळे मंदीराच्या गाभाऱ्यात आंब्यांच्या सुगंधाचा दरवळ पसरला होता.

ADVERTISEMENT

अक्षय तृतीया निमित्ताने पहाटे गुरव मंडळींची प्रक्षाळ पुजा झाल्यानंतर मयुरेश्वर मंदीराचा मुख्य गाभारा सर्व भक्तांसाठी खुला करण्यात आला.

दुपारी तीन वाजता श्रींची पुजा करण्यात आली. यानंतर गौरव गाडे, अर्थव धारक, प्रथमेश गाडे, नंदू धारक, श्रेयश धारक, अंकुश गुरव, महेश गाडे यांनी श्रींची पुजा करुन मयुरेश्वर व सिद्धी बुद्धी मातेस पोशाख चढविला.

यानंतर सुमारे सहाशे आंब्यांची सुंदर आरास करण्यात आली.

या सजावटीमुळे मयुरेश्वराच्या गाभाऱ्याला एक मनमोहक रुप प्राप्त झालं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT