Sharad Pawar-Ajit Pawar एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या भेटीने काय दिले संकेत?
अजित पवारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. दुसरीकडे शरद पवारही अजित पवार गटाबद्दल मवाळ झाल्याचे दिसत आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांचे कौतुक केले. शिवसेनेचे मुखपत्र सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्र सरकारमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे नेते अशात शब्दात कौतुक केले. अजित पवार हे कुशल प्रशासक असल्याचे सांगून ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या विभागात चांगले काम केले. (Maharashtra Political Latest News)
उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरील दाव्याबाबत शरद पवार यांना भूमिका मांडण्यास सांगितले आहे. अजित यांच्याशी झालेल्या तीन बैठकीनंतर शरद पवारांची भूमिकाही मवाळ झाली आहे.
शरद पवारांच्या या भूमिकेमुळे त्यांचे समर्थक आमदारही संभ्रमात पडले आहेत. शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरेही गेल्या आठवड्यात त्यांच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर अजित पवार यांची भेट घेतली होती. आधी भेट आणि आता स्तुती, हे महाराष्ट्रात काही नवे समीकरण तयार होण्याचे संकेत आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
उद्धव ठाकरे मध्यस्थाच्या भूमिकेत आहेत का?
आपल्याच पक्षात अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या शरद पवारांसोबत असल्याचे उद्धव ठाकरे सातत्याने सांगत आहेत. तर दुसरीकडे ज्यांच्या नेतृत्वाखाली बंड झालं, त्या अजित पवार यांचेही ते कौतुक करताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांची अजित पवारांसोबतची भेट आणि आता स्तुतीसुमने काका-पुतण्यातील वैर संपवण्याच्या दिशेने पुढे जाण्याची चिन्हे नाहीत ना? उद्धव ठाकरे मध्यस्थाच्या भूमिकेत आहेत का? असा प्रश्न पुढे आला आहे.