पुणे : ITI च्या विद्यार्थ्याचा मित्रानेच केला खून; आंबेगाव तालुक्यात खळबळ
Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोणवडी येथील आयटीआय वसतिगृहाच्या टेरेसवर वर्गातीलच एका विद्यार्थ्याने सौरभ संतोष साखरे या 23 वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : ITI च्या विद्यार्थ्याचा मित्रानेच केला खून
आंबेगाव तालुक्यात खळबळ
Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोणवडी येथे असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) शिक्षणासाठी आलेल्या एका 23 वर्षीय विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्याने चाकूने भोसकून खून केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक परिसरात खळबळ उडाली असून तरुणांमधील वाढत्या हिंसक प्रवृत्तीबद्दल सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : सोलापूर विधानपरिषद : गोरे म्हणाले विरोधकांकडे 16 मतंही नाहीत, आता धैर्यशील मोहितेंचं जोरदार प्रत्युत्तर
मृत विद्यार्थ्याचे नाव सौरभ संतोष साखरे (वय 23, रा. चिंचपूर, ता. धारूर, जि. बीड) असे असून तो आयटीआयमध्ये प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. या घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
धारदार चाकूने सौरभवर अचानक हल्ला
प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री सौरभ आणि त्याच्या वर्गातील अमेय भिकाजी कोकरे (वय 19) हे दोघेही संस्थेच्या टेरेसवर झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास दोघांमध्ये नक्की कोणत्या कारणावरून वाद झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या वादाचे रूपांतर थेट रक्ताच्या खेळात झाले आणि संशयित आरोपी अमेयने आपल्याकडील धारदार चाकूने सौरभवर अचानक हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सौरभच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून बीड जिल्ह्यातून त्याचे नातेवाईक मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.









