बायको अन् मुलांची हत्या करुन अंगणात फेकलं, शेजाऱ्यांनी बघताच...
एका कौटुंबिक वादातून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील या नवऱ्याने संतापाच्या भरात बायको आणि दोन मुलांना संपवलं. यामागे नेमकं काय कारण होतं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बायको अन् दोन मुलांना मारुन अंगणात फेकलं,
शेजाऱ्यांनी बघताच...
Crime News : एका कौटुंबिक वादातून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलराम नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी रविता आणि आरव व देबू या दोन निष्पाप मुलांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. या भयंकर कृत्यानंतर आरोपी पतीने जवळच्या रेल्वे रुळावर जाऊन रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. शनिवारी (27 जून) सकाळी या घटनेची माहिती उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील किशनपूर गावातील ही घटना आहे.
कार्यक्रमात डान्स केला म्हणून...
या हत्याकांडामागील मुख्य कारण एका कार्यक्रमातील डान्स असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी गावात भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यातील सांस्कृतिक कार्यक्रमात रविताने डान्स केला होता. याच कारणावरून बलराम तिच्यावर नाराज होता आणि दोघांमध्ये सतत वाद होत होते. रविताचे वडील मलखान यांनी सांगितले की, या वादानंतर बलरामने रविताला मारहाण केली होती आणि घरात ठेवण्यास नकार दिला होता. त्यामुळे 17 तारखेला ते मुलीला आपल्या कुतबार येथील माहेरी घेऊन गेले होते, परंतु 24 तारखेला बलरामने नातेवाईकांसोबत जाऊन तिला पुन्हा सासरी आणले होते.
हे ही वाचा : Maharashtra Weather : मुंबईसह 'या' जिल्ह्यांत पाऊस धुमाकूळ घालणार तर..
मुलं आणि बायकोला कुऱ्हाडीनं संपवलं
सासरी परतल्यानंतरही नवरा-बायकोमधील वाद मिटला नाही. शुक्रवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. या रागाच्या भरात बलरामने आधी आपल्या दोन निष्पाप मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांना संपवले आणि त्यानंतर पत्नी रविताचीही कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. यानंतर तो थेट जवळच्या रेल्वे ट्रॅकवर पोहोचला आणि तिथे ट्रेनसमोर येऊन त्याने स्वतःचेही जीवन संपवले. शनिवारी सकाळी शेजाऱ्यांना घरात कोणतीही हालचाल न दिसल्याने त्यांना संशय आला आणि त्यांनी आत डोकावून पाहिले असता अंगणात मृतदेह पडलेले दिसले, त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
हे ही वाचा : आप नेत्या नंदानी यांचा मृतदेह आढळला, विवाहित बॉयफ्रेंडवर खून केल्याचा आरोप
घरातील वाद अन् हत्या
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घरातील तीनही मृतदेह तसेच रेल्वे ट्रॅकवरील बलरामचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात घरात अनेक दिवसांपासून घरात वाद सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. भागवत कथेच्या कार्यक्रमात पत्नीने केलेल्या डान्समुळे पती मानसिकदृष्ट्या त्रस्त होता आणि याच वादातून त्याने पत्नी व मुलांची हत्या करून स्वतःही आत्महत्या केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.









