बीड : तलाठ्याच्या बायकोचे अनैतिक संबंध, लग्नाच्या 12 दिवसानंतर आयुष्याचा शेवट

मुंबई तक

Beed Crime News : तलाठ्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते, त्यामुळे त्याने लग्नाच्या 12 दिवसानंतर आत्महत्या केलीये. तो चंद्रपूरमध्ये तलाठी पदावर कार्यरत होता.

ADVERTISEMENT

Beed Crime News
Beed Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

बीड : तलाठ्याच्या बायकोचे अनैतिक संबंध

point

लग्नाच्या 12 दिवसानंतर आयुष्याचा शेवट

Beed Crime News : रोहिदास हातागळे | बीड : लग्न होऊन अवघे 12 दिवस झाले असतानाच, पत्नीच्या असलेल्या प्रेमसंबंधांमुळे आणि जाचाला कंटाळून गणेश दत्तू कोळी (वय 26) या तलाठी तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरातून ही घटना समोर आली होती. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात मृत तरुणाची पत्नी दिपाली हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का, राज ठाकरेंनी ज्यांचं घेतलेलं भरसभेत नाव त्यांचीच थेट शिवसेनेत एंट्री!

आधी पोलीस होता, मेहनत घेऊन तलाठी बनला 

गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी (रा. नांदूर्गा, ता. औसा, जि. लातूर) यांनी या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार,त्यांचा मुलगा गणेश हा 2021 मध्ये राज्य राखीव पोलीस बलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्यानंतर त्याने तलाठी परीक्षेचा अभ्यास करून 2024 मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली होती. मार्च 2026 मध्ये त्याचा विवाह बीड येथील दीपाली धनंजय कोळी हिच्याशी निश्चित झाला आणि 13 मे रोजी त्यांचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. दीपाली ही अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी स्वरुपात कार्यरत आहे.

हेही वाचा : महायुती 6 जागांवर बिनविरोध! तनपुरेंच्या जागेवर मात्र ड्रामा, विधानपरिषदेच्या 17 लढती एका क्लिकवर

हे वाचलं का?