गेल्या आठवड्यात, Google ने आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या जगात मोठी खळबळ उडवून दिली. त्यांनी AI मॉडेल Gemini 3 लाँच केले. हे मॉडेल अनेक बाबती ChatGPT पेक्षा श्रेष्ठ असल्याचे म्हटले जाते. मी अजूनही ते कसे वापरायचे ते शिकत आहे, म्हणून मी Gemini बद्दल नंतर लिहीन. या आठवड्यात, AI बाबत आणखी एक जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे AI हा बुडबुडा (Bubble) आहे का? हा बुडबुडा 25 वर्षांपूर्वी फुटलेल्या डॉट-कॉम बबलसारखा फुटेल का जो शेअर बाजाराला सोबत घेऊनच बुडेल?
ADVERTISEMENT
AI चा बुडबुडा म्हणजे काय?
गेल्या वर्षभरापासून AI बबलची चर्चा सुरू आहे, परंतु गुगलचे सुंदर पिचाई, Open AI चे संस्थापक सॅम ऑल्टमन आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या विधानांमुळे अलीकडेच त्याला वेग आला आहे. त्यांचा असा निष्कर्ष आहे की, गुंतवणूकदार AI कंपन्यांबद्दल अतिउत्साही आहेत, ज्यामुळे Valuation गगनाला भिडत आहे. पण हा बुडबुडा असू शकतो.
याच बुडबुड्याविषयी विविध इशारे दिले जात आहेत. गेल्या महिन्यात, बँक ऑफ इंग्लंडने शेअर बाजारातील AI शेअर्सबद्दल चिंता व्यक्त केली होती, त्यांना भीती आहे की, ते डॉट-कॉम बबलसारखे फुटू शकतात. JP Morganच्या एका अहवालात असे म्हटले आहे की, AI गुंतवणुकीवर 10% वार्षिक परतावा मिळवायचा असेल तरी दरवर्षी 650 अब्ज डॉलर्सची आवश्यकता असेल.
सध्या, सर्वात मोठी Generative AI कंपनी, Open AI, चे उत्पन्न अंदाजे 10 अब्ज डॉलर्स आहे. आम्ही आधीही सांगितलं आहे की, AI चं काम करण्यासाठी मोठ्या डेटा सेंटर्सची आवश्यकता आहे. तांत्रिक भाषेत, ही काम Compute करणं आहे किंवा त्याऐवजी, AI ला दिलेली कामे पूर्ण करण्यासाठी डेटा सेंटर्समध्ये गणना केली जाते.
डेटा सेंटर्समध्ये Compute चं काम GPU, किंवा Graphic Processing Unit करतात. जीपीयू मार्केटवर 90% वर वर्चस्व हे NVIDIA चं आहे. गेल्या आठवड्यात, शेअर बाजार त्याच्या निकालांवर बारकाईने लक्ष ठेवून होता. NVIDIA ची चिप विक्री वेगाने वाढत आहे. गेल्या तिमाहीत त्याचा नफा 32 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 65% जास्त आहे. अलीकडेच त्याचा शेअर्सची किंमत ही 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेली आहे, ज्यामुळे ती जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे.
मात्र, चांगले निकाल असूनही, NVIDIA चे शेअर्स घसरले आहेत. बाजारात अशी भीती आहे की, AI बबल डॉट-कॉम बबलप्रमाणेच सर्वांना बुडवू शकते. अमेरिकन शेअर बाजारात, Magnificent 7 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर्स एकूण बाजारपेठेच्या अंदाजे 36% आहेत. यामध्ये Apple, Microsoft, Google, Meta आणि Tesla यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात अमेरिकन शेअर बाजाराच्या निम्म्याहून अधिक नफ्यांमध्ये या कंपन्यांचा वाटा आहे. जर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली तर त्याचा उर्वरित बाजारावर परिणाम होऊ शकतो.
तर आपण काय केलं पाहिजे? JP Morgan चे CEO जेमी डायमन म्हणतात की, 'बाजारात एक बुडबुडा आहे, अनेकांना तोटा होईल, परंतु AI तंत्रज्ञान ही चांगली गोष्ट आहे.' असंच म्हणणं सुंदर पिचाई यांचही आहे. ते म्हणतात की, 'डॉट-कॉमचा बुडबुडा फुटला, परंतु इंटरनेट टिकून राहिला किंबहुना त्याने जगही बदलले.' AI मध्येही तीच क्षमता आहे. जेव्हा वीज आणि रेल्वे आली तेव्हा शेअर बाजारात एक बुडबुडा होता. तो फुटला, परंतु आजही ट्रेन आणि वीज चालू आहे.
'पैसा-पाणी' या विशेष सदरातील इतर महत्त्वाचे ब्लॉग वाचा
-
पैसा-पाणी: AI मुळे कोणाच्या नोकऱ्या जातील, कोणाच्या नोकऱ्या वाचतील?
-
पैसा-पाणी: ChatGPT चा नेमका कसा करायचा वापर?
-
पैसा-पाणी: AI तुम्हाला का मिळत आहे मोफत?
-
पैसा-पाणी: भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं का केलं बंद?
-
पैसा-पाणी: सोनं, चांदी की शेअर कशातून मिळेल सर्वाधिक पैसा.. संवत् 2082 मध्ये काय होईल?
-
पैसा-पाणी: TATA ग्रुपमध्ये एवढं भांडण का होत आहे?
-
पैसा-पाणी: बेरोजगारी कशी दूर होईल?
-
पैसा-पाणी: AI चा खोटेपणा पकडला गेला!
-
पैसा-पाणी: अमेरिका आणि भारतात ट्रेड डील होणार का?
-
पैसा-पाणी: तुम्हाला GST कपातीचा खरंच फायदा मिळेल का?
-
पैसा-पाणी: अमेरिकेच्या निशाण्यावर मुकेश अंबानी का आहेत?
-
पैसा-पाणी: भारताची अर्थव्यवस्था Economy Dead आहे का?
-
पैसा-पाणी: ED थेट अनिल अंबानींपर्यंत कशी पोहचली?
-
पैसा-पाणी : भारत आणि अमेरिकेतील 'ट्रेड डील' कुठे फसलीये? काय आहे डीलचा अर्थ? वाचा सविस्तर...
-
पैसा-पाणी : AI मुळे तुमची नोकरी जाणार? काय सांगतेय जगभरातली परिस्थिती?
-
पैसा-पाणी: भारताच्या GDP ची घोडदौड चौथ्या क्रमांकाच्या दिशेने, तरीही जनता गरीब का
-
पैसा-पाणी: रिझर्व्ह बँकेने दिली मोठी आणि आनंदाची बातमी!
-
पैसा-पाणी: Trump भारतात iPhone बनवण्याविरोधात का?
-
पैसा-पाणी: भारत-पाक तणाव, शेअर बाजाराचं काय होईल?
-
पैसा-पाणी: तुमची SIP सुरू ठेवा... कारण तुम्हीच आहात बाजाराचे खरे Hero!
-
पैसा-पाणी: एलॉन मस्कची डोकेदुखी वाढली... Tesla च्या नफ्यात घट, ट्रम्प यांच्यासाठी काम करणं पडलं महागात!
-
पैसा-पाणी: UPI वारंवार का होतं डाऊन?, पैसा हेच कारण!
-
पैसा-पाणी: बॉन्ड बाजाराच्या दबावामुळे माघार, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणून घेतला यू-टर्न?
-
पैसा-पाणी : संकटात संधी! ट्रंप यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतासाठी नवे दरवाजे उघडण्याची शक्यता
-
पैसा-पाणी: भारतीयांना सोन्याचं व्यसन, सरकारने मानली हार.. 3 मोठ्या योजना अपयशी!
ADVERTISEMENT











