डे-नाईट टेस्टसाठी मोटेरा स्टेडीयम सज्ज
जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान अशी ओळख मिळवलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा मैदान भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या डे-नाईट टेस्ट मॅचसाठी सज्ज झालंय. खेळाडूंच्या सरावासाठी मैदानावर खास सोय करण्यात आलेली आहे या स्टेडीयमवर एकावेळी एक लाखापेक्षा जास्त प्रेक्षक मॅच पाहू शकतात. मेलबर्नच्या मैदानाला मागे टाकत मोटेराने जगातील सर्वात मोठ्या मैदानाचा बहुमान आपल्या नावे जमा केला आहे. […]