अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पंढरपूरातील विठ्ठल-रुखुमाईचा विवाह सोहळा संपन्न झाला.
आजच्या खास दिवसासाठी मंदिराचा परिसर फुलांनी सजवण्यात आला होता.
विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी खास शुभ्र पोशाख तयार करण्यात आला होता.
विठ्ठल – रुक्मिणीची मूर्ती लग्न मंडपात आणून दोघांमध्ये अंतरपाठ धरुन देव-ब्राह्मण व भाविकांच्या साक्षीने हा विवाहसोहळा संपन्न झाला.
वसंत पंचमीच्या निमीत्ताने विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर गुलालाची उधळण करण्यात आली.
वसंत पंचमी ते रंगपंचमी पर्यंत पंढरपुरात देवाला असाच शुभ्र पोशाख घालून गुलालाची उधळण करण्यात येते.
या लग्नसोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे वधु-वराचा पोशाख हा खास फॅन डिझायनरने बनवला होता. बंगळुरुच्या फॅशन डिजायनर सविता चौधरी यांनी हा पोशाख तयार केला होता.
या लग्नसोहळ्यासाठी मंदिरात खास वाजंत्री बोलावण्यात आली होती.