तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडचा दणक्यात पराभव केल्यानंतर टीम इंडिया अखेरच्या टेस्ट मॅचसाठी जोरात तयारीला लागली आहे. गुरुवारपासून सुरु होणाऱ्या टेस्ट मॅचआधी नेट्समध्ये सराव करताना वॉशिंग्टन सुंदर
४ मॅचच्या सिरीजमध्ये टीम इंडिया सध्या २-१ ने आघाडीवर आहे. परंतू वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनलमध्ये खेळायचं असेल तर अखेरच्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला विजय किंवा किमान मॅच ड्रॉ करणं गरजेचं आहे.
फिल्डींग कोच एस. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना टीम इंडियाचे खेळाडू
विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतची कामगिरी ही नेहमी तळ्यात-मळ्यात असते. यासाठी प्रत्येक मॅचआधी कोच त्याच्याकडून अशा पद्धतीने जोरदार तयार करुन घेतात.
तिसरी टेस्ट मॅच गाजवणाऱ्या अक्षर पटेलच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.
प्रॅक्टीस सेशनदरम्यान हार्दिक पांड्या…
इंग्लंडचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमधलं आव्हान संपुष्टात आलेलं असलं तरीही भारताला फायनलमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी इंग्लंड शेवटची टेस्ट मॅच जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. यासाठी टीम इंडियाला गाफील राहून चालता येणार नाही.