Airtel: पाहा 99 रुपयाच्या प्लॅनमध्ये किती फायदे

मुंबई तक

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी पुन्हा स्वस्त प्लॅन लाँच करणं सुरु केलं आहे.

Airtel ने आता SMS बेनिफिटसह 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे.

या प्लॅनमध्ये कंपनीने 200 MB डेटा, 99 रुपयांचा टॉकटाइम देण्यात आला आहे.

याशिवाय टॅरिफ कॉल 1 पैसे प्रति सेकंद देण्यात आला आहे.

यामध्ये आपल्याला STD SMS साठी 1.5 रुपये मोजावे लागतील.

तर लोकल SMS साठी 1 रुपये खर्च करावे लागतील.

या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवस असणार आहे.

याआधी Jio आणि Vi ने देखील आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त प्लॅन लाँच केले आहेत.