Arun Lal weds Bulbul : अरुण लाल यांनी थाटला बुलबुल साहासोबत संसार; पहा खास क्षण

मुंबई तक

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू अरूण लाल यांनी बुलबुल साहा यांच्यासोबत लग्न केलं. अरुण लाल यांचं वय ६६ वर्ष असून, बुलबुल साहा त्यांच्यापेक्षा २८ वर्षांनी लहान आहेत.

कोलकातामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात ते लग्नाच्या बेडीत अडकले.

भारताचे एकेकाळचे सलामीवीर असलेल्या अरुण लाल यांनी दुसऱ्यांदा सात फेरे घेतले. पहिल्या पत्नीपासून त्यांनी घटस्फोट घेतला होता. रीना असं त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव असून, त्यांच्या परवानगीनंतर त्यांनी दुसरं लग्न केलं.

अरुण लाल आणि बुलबुल साहा यांनी केक कापला आणि नोंदणी पद्धतीने विवाह केला. या सोहळ्याला त्यांचे निकटवर्तीय उपस्थित होते.

या खास सोहळ्यासाठी गुलाबी रंगाचा केक तयार करण्यात आला होता. त्यावर अरुण वेड्स बुलबुल असं लिहिलेलं होतं. सोशल मीडियावर या केकचा फोटो व्हायरल झाला आहे.

सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन आणि सबा करीम हे उपस्थित होते. सबा करीमही प्रसिद्ध क्रिकेटपटू होते.

बुलबुल साहा शिक्षिका आहेत. स्थानिक शाळेत शिकवतात. बुलबुल साहा यांना स्वयंपाकाची आवड आहे. त्यांनी २०१९ मध्ये कुलिंग स्पर्धेत भाग घेतला होता.

लग्नानंतर अरुण लाल आणि बुलबुल साहांनी किस केलं. त्यांचा हा फोटोही सगळीकडे व्हायरल झाला होता.

या खास सोहळ्यासाठी बुलबुल साहा यांनी पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर अरुण लाल यांनी पंजाबी कोट परिधान केला होता.

अरुण लाल-बुलबुल यांनी हॉटेल पिअरलेस इन मध्ये रिसेप्शन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनेही हजेरी लावली होती.