कोण आहे 'बिकिनी गर्ल' Archana Gautam?, काँग्रेसने दिलं विधानसभेचं तिकिट

मुंबई तक

यूपी निवडणुकीसाठी काँग्रेसने 125 जणांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री अर्चना गौतम हिला मेरठच्या हस्तिनापूर येथून विधानसभेचं तिकिट देण्यात आलं आहे.

(फोटो सौजन्य: archana gautam/instagram)

अर्चना गौतम ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. जी मिस बिकिनी इंडिया, मिस बिकिनी यूनिव्हर्स इंडिया आणि मिस बिकिनी यूनिव्हर्सचं विजेतेपद पटकावलं होतं.

(फोटो सौजन्य: archana gautam/instagram)

अर्चना गौतम हिने मेरठच्या IIMT मधून BJMC ची डिग्री मिळवली आहे.

(फोटो सौजन्य: archana gautam/instagram)

2015 साली अर्चना गौतम हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र आता ती राजकारणात प्रवेश करणार आहे.

(फोटो सौजन्य: archana gautam/instagram)

2018 साली मलेशियातील मिस टॅलेंट 2018 किताब जिंकून अर्चनाने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. तेव्हापासून ती अनेक जाहिरातींमध्ये देखील झळकली आहे.

(फोटो सौजन्य: archana gautam/instagram)

अर्चनाने विवेक ओबेरॉयच्या ग्रेट ग्रँड मस्ती सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केलं होतं. ज्यानंतर ती हसीना पारकर आणि बारात कंपनी या सिनेमांमध्येही दिसली होती.

(फोटो सौजन्य: archana gautam/instagram)

अर्चनाने अनेक म्युझिक व्हीडिओमध्ये देखील काम केलं आहे. तसंच काही आयटम नंबर्स देखील तिने केले आहेत.

(फोटो सौजन्य: archana gautam/instagram)

बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर अर्चना गौतम दाक्षिणात्य सिनेमाकडे वळली होती.

(फोटो सौजन्य: archana gautam/instagram)

सिनेसृष्टीत फारसा जम न बसू शकलेल्या अर्चना गौतम ही आता राजकारणाकडे वळली आहे. त्यामुळे आता अर्चनाला राजकारणात किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

(फोटो सौजन्य: archana gautam/instagram)

अर्चना आता सध्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. अशावेळी तिला कितपत यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(फोटो सौजन्य: archana gautam/instagram)