रोमँटिक सेलिब्रेशन! दीपिका-रणवीरने शेअर केले खास फोटो

मुंबई तक

अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत.

photos- ranveer singh/instagram

लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा कऱण्यासाठी दोघेही उत्तराखंडमधील खास ठिकाणी पोहोचले आहेत.

दीपिका आणि रणवीरने त्यांच्या इन्स्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील बहुतांश फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असून, त्यामुळे ते आणखीनच सुंदर दिसत आहे.

यातील काही फोटो दोघे मस्ती करतानाचे आहेत. तर काही फोटोत दीपिका शांतता अनुभवताना दिसत आहे.

अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न केलं होतं.

photos- ranveer singh/instagram

रणवीर आणि दीपिकाची पहिली भेट संजय लीला भन्साळी यांच्या घरी झाली होती.

रामलीला चित्रपटावेळी ही भेट झाली होती. दोघांनीही वेगवेगळ्या मुलाखतीत हे सांगितलेलं आहे.

या भेटीवेळी दोघे सोबतच जेवले. जेवताना रणबीर दीपिकाला म्हणाला की, 'तुझ्या दातात काहितरी अडकलं आहे.'

ते ऐकुन दीपिका रणवीरला म्हणाली, 'तूच काढून दे ना.' इथूनच त्यांच्यात जवळीक वाढत गेली.

दीपिका आणि रणवीर यांनी अनेक हिट चित्रपटसोबत केले आहे.फाइनडिंग फैनी, बाजीराव-मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांत दोघांनी सोबत काम केले आहे.

photos- ranveer singh/instagram