Terror Module : दाऊदचा भाऊ देता होता सूचना; लष्करी अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली प्रशिक्षण

मुंबई तक

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी घातपाताचा मोठा डाव उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी अंडर वर्ल्ड डॉन दाऊदच्या गँगशी संबंधित सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघांनी पाकिस्तानमध्ये स्फोटकं बनवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. दरम्यान, यातील एक जण मुंबईतील असून, या दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याचं समोर आलं आहे.

दाऊद गँगने भारतात घातपात घडवण्यासाठी दोन टीम तयार केल्या. यातील एक टीम दाऊदचा भाऊ अनिस इब्राहीम चालवत होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. (छायाचित्रात संशयित झिशान कमर.)

दाऊद इब्राहिमचा भाऊच्या नियंत्रणाखाली असलेल्या टीममधील लोकांना सीमेपलीकडून भारतात शस्त्रसाठा आणण्याचं काम सोपवलेलं होतं. तर दुसऱ्या टीमला हवाला मार्गे पैसा जमा करण्याचं दिलेलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. (अटक करण्यात आलेला आरोपी मूलचंद.)

या आरोपींना दिल्ली पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. (छायाचित्रात संशयित मोहम्मद शेख उर्फ समीर कालीया)

दहशतवाद्यांना लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून प्रशिक्षण दिलं गेलं असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. (छायाचित्रात संशयित अमीर जावेद)

मोहम्मद शेख, ओसामा, मूलचंद आणि मोहम्मद अबू बकर या चार आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. छायाचित्रात संशयित मोहम्मद अबू बकर.

अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाला मुंबईतून अटक करण्यात आलेली आहे. अली मोहम्मद शेख उर्फ समीर कालीया असं त्याचं नाव आहे. तो मुंबईत टॅक्सी चालवायचा. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याचंही समोर आलं आहे. छायाचित्रात ओसामा.