तुम्हाला या स्टार क्रिकेटर्सचे निक नेम माहितीयेत?

मुंबई तक

महेंद्रसिंह धोनी: धोनीला सगळे कॅप्टन कूल म्हणूनच ओळखतात. पण अवघं क्रिकेट विश्व आणि चाहते त्याला 'माही' अशीच हाक मारतात. पण त्याचा घरचे लोक त्याला 'मही' या टोपण नावाने बोलवतात.

(फोटो सौजन्य: Instagram)

राहुल द्रविड: 'दी वॉल' नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडला भारतीय संघातील खेळाडू 'जेमी' नावाने हाक मारायचे.

(फोटो सौजन्य: Instagram)

अजित आगरकर: अजित आगरकरला 'बॉम्बे डक' नावाने सर्व खेळाडू हाक मारतात.

(फोटो सौजन्य: Instagram)

युवराज सिंग: युवराजला सगळे सिक्सर किंग म्हणून ओळखतात. तर खेळाडू त्याल युवी म्हणून हाक मारतात.

(फोटो सौजन्य: Instagram)

विराट कोहली: कोहलीला लोक प्रेमाने 'चिकू' म्हणून बोलवतात. त्याला हे नाव त्याच्या दिल्लीतील कोच अजित चौधरी यांनी दिलं होतं.

(फोटो सौजन्य: Instagram)

गौतम गंभीर: गौतम गंभीर याला त्याचे सहकारी प्रेमाने 'गौती' म्हणून हाक मारतात.

(फोटो सौजन्य: Instagram)

रोहित शर्मा: टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माला त्याचे सहकारी 'शाना' नावाने बोलवतात.

(फोटो सौजन्य: Instagram)

सुरेश रैना: भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैना याला सोनू असं टोपण नाव आहे. त्याला लहानपणापासूनच या नावाने सर्वजण हाक मारतात.

(फोटो सौजन्य: Instagram)

सचिन तेंडुलकर: सचिन तेंडुलकर याला त्याचे वरिष्ठ सहकारी तेंडल्या नावाने हाक मारायचे तर ज्युनियर खेळाडू 'पाजी' नावाने बोलवायचे.

(फोटो सौजन्य: Instagram)

हरभजन सिंह: हरभजन सिंहला सगळेच 'भज्जी' म्हणूनच हाक मारतात.

(फोटो सौजन्य: Instagram)