Gujrat CM : पहिल्यांदाच आमदार झाले अन् भाजपने केलं मुख्यमंत्री; कोण आहेत भूपेंद्र पटेल?

मुंबई तक

विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबद्दल २४ तासांपासून गलबतं सुरू होती.

Bhupendra patel/Twitter

केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह तीन ते चार नावांची चर्चा सुरू होती, पण ऐनवेळी घोषित करण्यात आलेल्या नावाने सर्वांनाच धक्का बसला.

विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन भाजपकडून पाटीदार चेहरा समोर आणण्यात आला आहे. भाजप बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीत आमदार भूपेंद्र पटेल यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली.

गेल्या २४ तासांपासून वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू होती. मात्र, या सगळ्या नावांना बाजूला सारत भाजपने भूपेंद्र पटेल यांच्या हाती मुख्यमंत्री पदाची सूत्रं सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भूपेंद्र पटेल कोण आहेत? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Bhupendra patel/Twitter

भूपेंद्र पटेल गुजरातमध्ये महत्त्वाच्या असलेल्या पाटीदार समाजातून येतात. ते गुजरातच्या माजी मुख्यमंत्री व सध्याच्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात.

भूपेंद्र पटेल २०१७ मध्ये पहिल्यांदाच आमदार बनले. त्यांनी अहमदाबाद जिल्ह्यातील घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांना लाख ७५ हजारांहून अधिक मतं मिळाली होती.

भूपेंद्र यादव यांनी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत पटेल यांचा पराभव करत विधानसभेत पाऊल ठेवलं होतं.

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आनंदीबेन पटेल यांची राज्यपालपदी वर्णी लावण्यात आली होती. मात्र, आनंदीबेन पटेल यांच्या सांगण्यावरूनच भूपेंद्र पटेल यांनी तिकीट देण्यात आलं होतं.

भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदीही काम केलं आहे. त्याचबरोबर अहमदाबाद नागरी विकास प्राधिकरणाचेही ते अध्यक्ष होते.

Bhupendra patel/Twitter

भूपेंद्र पटेल यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेलं आहे. ते पाटीदार समाजातील सरदार धाम आणि विश्व उमिया फाऊंडेशनचे ते विश्वस्तही आहेत.