Express Accident: एक्सप्रेसचा भीषण अपघात, अपघाताचे 10 फोटो

मुंबई तक

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी भागातील मैंगुडी येथे बिकानेर एक्सप्रेस (15633) रुळावरून घसरुन भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सुमारे 20 जखमींना आतापर्यंत रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

या अपघातात ट्रेनचे तब्बल 12 डबे रुळावरून घसरले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वाढली आहे.

ही घटना गुरुवारी सायंकाळी 5.15 च्या सुमारास घडली. बिकानेर एक्सप्रेस ट्रेनचे 12 बोगी रुळावरून घसरले असून प्रवाशांनी भरलेले 4 डबे पूर्णपणे उलटले आहेत.

ही ट्रेन बिकानेरहून गुवाहाटीला जात होती. दरम्यान, मैंगुडी येथे हा अपघात झाला. माहिती मिळताच, रेल्वे पोलीस प्रशासनासह जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोहोचले

नजीक कोणतेही स्थानक नव्हते आणि ट्रेन मोकळ्या भागातून जात असतानाच तिथे अपघात झाला. त्यामुळेच बचाव पथकाला तातडीने मदतीला येण्यास वेळ लागला.

जखमी प्रवाशांवर उपचार करण्यासाठी तब्बल 51 रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.

उत्तर बंगालमधील वैद्यकीय महाविद्यालयांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर रुग्णालयात हजर होण्यास सांगण्यात आले आहे.

या अपघाताच्या वृत्तानंतर त्या प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी 0151-2208222 हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे, तर जयपूरच्या लोकांसाठी हेल्पलाइन क्रमांक- 0141- 2725942 रेल्वेने जारी केला आहे.

रेल्वे अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही चर्चा केली आहे.