पाहा IAS टीना दाबीच्या दुसऱ्या लग्नाचा अल्बम

मुंबई तक

IAS टीना दाबी आणि प्रदीप गावंडे 20 एप्रिलला लग्न बंधनात अडकले.

लग्नाला आता साधारण दीड महिना उलटून गेल्यानंतर टीना दाबीने स्वत: आपल्या या दुसऱ्या लग्नाचा अल्बम सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या अल्बममध्ये त्यांच्या मेहंदी, लग्न ते रिसेप्शन अशा सगळ्या सोहळ्याचे फोटो आहेत.

हे फोटो शेअर करताना टीनाने म्हटलंय की, 'फायनली, माझ्या लग्नाचा अल्बम आला.'

हा टीनाच्या मेहंदी सोहळ्याचा फोटो आहे. ज्यामध्ये तिच्या हातावर सुंदर मेहंदी पाहायला मिळत आहे.

संगीत सोहळ्याला टीनाने सुंदर असा पिंक कलरचा लेहंगा परिधान केला होता.

या कपलचा रोमांटिक अंदाज लोकांना खूपच आवडत आहे.

संगीत सेरेमनीमध्ये प्रदीप गावंडे हे देखील मजा-मस्ती आणि नाचताना दिसून आले.

पांढरी साडी आणि केसात गजरा लावलेली टीना ही लग्न सोहळ्यात खूपच सुंदर दिसत होती.

लग्नानंतर या जोडप्याने केक कापून आपला आनंद साजरा केला.

रिसेप्शनमध्ये टीनाने ब्ल्यू कलरचा सुंदर असा लेहंगा परिधान केला होती. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.

यावेळी टीनाचे पती प्रदीप गावंडे यांनी देखील ब्ल्यू कलरची शेरवानी परिधान केली होती.

याआधी टीनाने 2018 साली IAS अतहर खानशी लग्न केलं होतं. पण 2020 साली त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता.