'या' क्रिकेटर्संना खावी लागलीय जेलची हवा!

मुंबई तक

भारताचा माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू याला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. एका व्यक्तीच्या हत्येच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती.

(फोटो सौजन्य: Instagram)

ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न याला देखील 2003 साली अटक करण्यात आली होती.

(फोटो सौजन्य: Instagram)

बेन स्टोक्सचं मैदानाबाहेरील वर्तन फारसं चांगलं नाहीए. यामुळेच त्याला तुरुंगाची देखील हवा खावी लागली आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

द. आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एंटनी याला 1998 साली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखील अटक करण्यात आली होती.

(फोटो सौजन्य: Instagram)

पाकिस्तानचा क्रिकेटर उमर अकमल याला ट्रॅफिक पोलिसांशी भिडणं महागात पडलं होतं. ज्यामुळे त्याला तुरुंगात देखील जावं लागलेलं.

(फोटो सौजन्य: Instagram)

भारताचा क्रिकेटर अमित मिश्राला देखील तुरुंगाची हवा खावी लागली होती. आपल्या एका मैत्रिणीवर कथित बॉटल फेकल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.

(फोटो सौजन्य: Instagram)

माजी क्रिकेटर विनोद कांबळी याला देखील 2015 साली आपल्या मोलकरणीला मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

(फोटो सौजन्य: Instagram)

जातीवाचक टिप्पणी केल्याने युवराजला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. पण नंतर त्याला कोर्टाकडून जामीनही मंजूर झाला होता.

(फोटो सौजन्य: Instagram)

पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद आसिफ, सलमान बट आणि मोहम्मद आमिर यांना मॅच फिक्सिंग प्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागली होती.

(फोटो सौजन्य: Instagram)