मुंबई तक
दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आज भक्तीमय वातावरणात करण्यात येत आहे. प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा देखील विसर्जनासाठी रवाना झाला आहे.
आज पाणावलेल्या डोळ्यांनी गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक काढण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे लालबागचा राजा मंडळाने साधेपणाने मिरवणूक काढली आहे.
दरवर्षी लालबागच्या राजाच्या मिरवणुकीसाठी लाखोंची गर्दी होते. मात्र, यंदा कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन मंडळाने कोणताही गाजावाजा न करता विसर्जन मिरवणूक काढली आहे.
यंदा लालबागच्या राजाचं दर्शन देखील भक्तांना ऑनलाइन घेता आलं. कारण गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी बड्या सेलिब्रिटींची आणि राजकीय नेत्यांची रिघ लागल्याचं पाहायला मिळतं. मात्र, यंदा या सगळ्या देखील ऑनलाइन दर्शनावरच समाधान मानावं लागलं आहे.
कोरोनाच्या विघ्नामुळे सलग लालबागच्या राजाचानिरोप सोहळा साधेपणानं पार पडत आहे.
दरवर्षी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक 24 तासांहून अधिक चालते. मात्र, यंदा ही मिरवणूक झटपट आटोपण्यात येणार आहे.