मुंबई तक
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा शासन नियमानुसार फक्त 4 फूट उंचीची मूर्ती बसवणार आहे.
आतापर्यंत लालबागचा राजा मंडळ साधारण 20 ते 21 फुटापर्यंतची मूर्ती बसवायचे. पण आता चार फुटाची मूर्तीची स्थापना करणार असल्याने त्यासाठी नवे दागिने घडविण्यात आले आहेत.
लालबागच्या राजाचे हे नवे दागिने चांदीचे असून त्यांना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.
लालबागमधील सोन्याचे व्यापारी नाना वेदक यांनी हे सगळे दागिने घडवले आहेत.
नव्या मूर्तीसाठी बाजूबंद, सोंडपट्टा, परशूकडे, श्रीमंत हार, मोठा हार, बिकबाळी, कडे आणि अंगठी असे दागिने घडविण्यात आले आहेत.
हे सर्व दागिने 2 किलो 31 ग्रॅम चांदीमध्ये तयार करण्यात आले आहेत.