कोल्हापूरच्या अंबाबाईचं महिषासूरमर्दिनी रुप पाहिलंत का?

मुंबई तक

शारदीय नवरात्र उत्सवानिमीत्त आज अष्टमीच्या तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई महिषासुरमर्दिनी रुपात सजली आहे.

महिषासूरमर्दिनी हे कोल्हापूरच्या अंबाबाईचं भक्तांना भुरळ घालणारं एक सुंदर आणि मनमोहक रुप मानलं जातं.

या रूपामध्ये अंबाबाई ही आई आहेच पण त्याबरोबर या आईचा रक्षणकर्ती हा भाव अधिक उठून दिसतो.

इंद्रादी सर्व देवांना पराजित करून फक्त त्यांचा अधिकारच नव्हे तर त्यांचे निवासस्थान सुद्धा काढून घेऊन रंभ पुत्र महिषासुरा ने स्वतःचा एकछत्री अंमल प्रस्थापित केला.

महिषासुर हा प्रत्येक कल्पात पुन्हा पुन्हा जन्माला आला देवीने कल्प भेदाने अनेक अवतार धारण करून त्याचा संहार केला.

शक्तीपीठांच्या परंपरेत करवीर क्षेत्र हे महिषमर्दिनी चे क्षेत्र म्हणून ओळखले जाते यालाच अनुसरून आज अष्टमीच्या दिवशी करवीर निवासिनी महिषासूर मर्दना साठी सज्ज असलेल्या रूपामध्ये सजते.

ही अनादि निर्गुण भवानी आमच्या अंतकरणात पुन्हा एकदा प्रकट होऊ दे धर्मरुप सिंहावरती स्वार होऊ दे.

अष्टांग योगाची आयुध धारण करू दे. आणि आमच्या मोह महिषासुराचा संहार करू दे हाच या चण्डिके चरणी जोगवा मागतो. आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा